Header Ads

Ahmednagar News: महाविकास आघाडीचा लोकसभेला उमेदवार कोणीही असो निवडून आणणे आवश्यक- आ.बाळासाहेब थोरात

 महाविकास आघाडीची लोकसभेच्या पार्शवभूमीवर  बैठक संपन्न

Ahmednagar News: महाविकास आघाडीचा लोकसभेला उमेदवार कोणीही असो निवडून आणणे आवश्यक-बाळासाहेब थोरात              अहमदनगर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्ष, शिवसेना ठाकरे गट  राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी च्या पदाधिकाऱ्यांची  लोकसभेच्या दृष्टीने बैठक संपन्न झाली.


यावेळी  कॉग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आ बाळासाहेब थोरातआ.लहू कानडे,जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा शशिकांत गाडे व राजेंद्र दळवी शहर अध्यक्ष संभाजी कदम,काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयंत वाघशहर अध्यक्ष किरण काळे,


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळकेशहर अध्यक्ष अभिषेक कळमकर,माजी महापौर भगवान फुलसौदेर,जेष्ठ नेते अरुण कडू,बाबासाहेब भिटे ,अशोक गायकवाड,शौकतभाई तांबोळी,युवा नेते विक्रम राठोड,यांच्यासह तिन्ही पक्षाचे नगरसेवक,पदाधिकारी उपस्थित होते.

 

             आ थोरात म्हणाले महाविकास आघाडी लोकसभेला उमेदवार जो दिला जाईल तो कोणीही असो,कोणत्याही पक्षाचा असो निवडून आणणे गरजेचे आहे त्यादृष्टीने आपल्यात सामंजस्य असायला हवे यासाठी हि बैठक आहे,२७ फेबु पर्यंत कोणत्या पक्षाला उमेदवारी दिली जाईल हे आघाडीच्या बैठकीत जाहीर होईल व नंतर तो पक्ष उमेदवार जाहीर करेल.


 आघाडीच्या कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळाली तरी आपण तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यानी समन्वय करून जागा जिंकायची यासाठी आज समन्वय समितीची स्थापना करण्यात  येत आहे ती जिल्हा,तालुकावर काम करेल व मेळावे व नियोजन करेल असेही ते म्हणाले.


 पहिली आघाडीची बैठक फुलसौन्दर व वाघ यांच्या कल्पनेतून अहमदनगरला झाल्याबद्दल आमदार थोरात यांनी केले कौतुक  


        माजी महापौर भगवान फुलसौन्दर व जयंत वाघ यांच्या कल्पनेतून हि पहिली आघाडीची बैठक लोकसभेच्या दृष्टीने नगरला झाली याबद्दल त्याचे थोरात यांनी कौतुक केले .यावेळी अनेक पदधिकाऱ्यानी आपल्या सूचना व मनोगत व्यक्त केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.