Header Ads

Ahmednagar Runners: ‘हम फिट तो नगर फिट’ मोहिमत सहभागी व्हा-योगेश खरपुडे


Ahmednagar Runners: अहमदनगर  रायझिंग मॅरेथॉन स्पर्धेत अहमदनगर रनर्स क्लबचे शेळके, डॉ.मुळे, डॉ.तारडे पोडियम फिनिशर ठरले

Ahmednagar Runners: अहमदनगर  रायझिंग मॅरेथॉन स्पर्धेत अहमदनगर रनर्स क्लबचे शेळके, डॉ.मुळे, डॉ.तारडे पोडियम फिनिशर ठरले




     अहमदनगर (प्रतिनिधी)  -  अहमदनगर रायझिंग फौंडेशन आयोजित मॅक्सिमस हाफ मॅरेथॉन मोठ्या उत्साहात, जल्लोषात पार पडली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अहमदनगर रनर्स क्लबचे धावपटू यामध्ये इंजिनिअर, सी.ए., वकिल, डॉक्टर्स, व्यवसायिक सहभागी झाले होते.


     नगर रायझिंग मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्स क्लबचे तीन रनर्स पोडियम फिनिशर ठरले. यामध्ये 21 कि.मी. मध्ये संजय शेळके प्रथम, 10 कि.मी.मध्ये  डॉ.महेश मुळे द्वितीय तर डॉ.शाम तारडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.


     या मॅरेथॉनसाठी अहमदनगर रनर्स क्लबचे चार कॉम्रेड रनर योगेश खरपुडे, जगदीप मकर, गौतम जायभाय, विलास भोजने हे रेस अ‍ॅम्बेसेडर होते. क्लबच्या सदस्यांनी प्रोत्साहन दिले. यावेळी रनरचा सहभाग वाढविण्यासाठी नावनोंदणी स्टॉलला  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर रायझिंग फौंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, अहमदनगर सायकलिंग क्लबचे गौरव फिरोदिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्टॉलला भेट दिली.


     यावेळी ‘हम फिट तो नगर फिट’ या टॅग लाईन खाली नवीन मोहिम हाती घेण्यात आली अहमदनगरमधील मॅरेथॉनसाठी रनरची संख्या वाढविण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर रनर्स क्लबने नावनोंदणीचे आवाहन केले. अधिक माहितीसाठी योगेश खरपुडे (मो.9552532899) यांच्याशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.