Header Ads

Ahmednagar Shivsena: सरकारी कामे होत नाही अधिकारी ऐकत नाही शिवसैनिकांनी वाचला तक्रारीचा पाढा

 शिवसेनेची अहमदनगर जिल्हा आढावा बैठक संपन्न

Ahmednagar Shivsena: सरकारी कामे होत नाही अधिकारी ऐकत नाही शिवसैनिकांनी वाचला तक्रारीचा पाढा


 

       अहमदनगर (प्रतिनिधी)-येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेची नगर जिल्हा आढावा बैठक शिवसेना सचिव विभागीय संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी व लोकसभा निरीक्षक अभिजात कदम यांच्या उपस्थितीत पार पडली. 


यावेळी जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले व अनिल शिंदे,संपर्क प्रमुख सचिन जाधव,शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते,आनंद शेळके,दामोदर भालसिंग,आमोल हुंबे आदींसह सर्व तालुक्याचे प्रमुख, महिला आघाडी प्रमुख, युवा सेना प्रमुख व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्तिथ होते.


 पुढील महिन्यात शिवसेनेचा मेळावा खा श्रीकांत शिंदे यांच्या  उपस्थितीत 

 

              पुढील महिन्यात शिवसेनेचा मेळावा खा श्रीकांत शिंदे यांच्या उपस्तिथीत घेण्यात येणार आहे त्याची पूर्व तयारी तसेच पक्ष वाढीसाठी ,नवीन नियुक्ती करणे ,नवीन शाखा उघडणे यासाठी हि बैठक घेण्यात आली.


 यामध्ये शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य पर्यंत पोहचवणेसर्वांच्या अडीअडचणी समजून घेणे व त्यावर उपाय करणे पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली कामे शासकीय निधीतून होतात नाही याची चर्चा करण्यात आली. यावेळी अनेकांनी तक्रारीचा पाढा वाचला यामध्ये प्रामुख्याने सरकारी कार्यालयात शिवसैनिकांची कामे होत नाही अधिकारी ऐकत नाही अश्या होत्या.

 

          यावर सर्वांच्या सूचना व अडचणी समजून त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल असे चौधरी यांनी सांगितले प्रत्येक तालुक्यातील पदधिकाऱ्याची स्वतंत्र बैठक घेण्यात आली होती यावेळी सर्व तालुक्यातून मोठ्या संख्नेने पदाधिकारी आले होते 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.