Header Ads

Ahmednagar Shivsena: अहमदनगर शहरात सध्या प्लॉटवर ताबा मारणे आणि गोरगरिबांना लुटण्याचे प्रकार सुरू: सुषमा अंधारे

 ठाकरे गटाच्या मुक्त संवाद यात्रेचे शहरात आगमन

Ahmednagar Shivsena: अहमदनगर शहरात सध्या प्लॉटवर ताबा मारणे आणि गोरगरिबांना लुटण्याचे प्रकार सुरू: सुषमा अंधारे

 

                 अहमदनगर (प्रतिनिधी)-ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रेचे  नगर शहरात आगमन झाले.सकाळी गांधी मैदान  शेतकऱ्याशी व दूध विक्रेत्यानिशी संवाद साधल्यावर यात्रा स्टेशनरोड येथील यश ग्रॅन्डवर आली या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


 तत्पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख व हॉटेलचे संचालक प्रा शशिकांत गाडे यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेयावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर,शहरप्रमुख संभाजी कदम,नागसेवक योगीराज गाडे,दत्ता जाधव,बाळासाहेब हराळ आदी उपस्थित होते.

 

           पत्रकार परिषदेत अंधारे यांनी  अहमदनगर शहरातील विविध प्रश्नांवर भाष्य केले.त्यांनी नगरमधील ताबेमारीच्या विषयावरून लोकप्रतिनिधींसह राजकीय नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.त्या म्हणाल्या आम्ही राज्यातील विविध ठिकाणी फिरत आहोत लोकांचे प्रश्न जाणून घेत आहोत मात्र नगर शहरात आले असता आम्हाला प्रामुख्याने ताबेमारीचा गंभीर विषय जाणवला.


नगर शहरात ताबेमारीचे प्रमाण वाढत चालले आहे.प्लॉटवर ताबा मारणे आणि गोरगरिबांना लुटण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.राज्यातील विविध ठिकाणी फिरलो असता लोकांच्या वेगवेगळ्या समस्या होत्या.शैक्षणिकशेतकीय समस्या होत्या.मात्र नगरमध्ये ताबेमारीच्या समस्या दिसून आल्या.


           तक्रारदारांना आश्वासन देताना अंधारे म्हणाले की आचारसंहिता पूर्वी मी या सर्व तक्रारदारांना एकत्रित करून नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढला जाईल.यावर चर्चा केली जाईल असे त्या म्हणाल्या. 


             अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारणी करण्यात आली आहे.मात्र शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला जात नसल्याच्या देखील तक्रारी मिळाल्याचे अंधारे म्हणाल्या. ठेकेदार आहेत त्यांचे थेट संबंध या राजकीय व्यक्तींशी असल्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहेअसे अंधारे म्हणाल्या.


       मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा सिंदखेड राजा येथून सुरु झाली असून ती आज नागरमार्गे पुढे जाणार आहे व शिवाजीपार्क वर त्याची सांगता होणार आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.