Header Ads

Ahmednagar Wachnalay: जनमाणसात मराठीला समृद्ध करण्याची जबाबदारी आमचीच -साहित्यीक उपेंद्र निकाळजे

अहमदनगर जिल्हा वाचनालयात मराठी भाषा गौरव दिनी साहित्यीकांचा मांदियाळी


जनमाणसात मराठीला समृद्ध करण्याची जबाबदारी आमचीच -साहित्यीक उपेंद्र निकाळजे  अहमदनगर (प्रतिनिधी)  - मराठी भाषा अनेक संत, साहित्यिक, प्रतिभावंतांनी आपल्या लेखणीतून, मराठी भाषेला समृद्ध केले आहे, ही साहित्याची समृद्धी जनसामन्यांपर्यंत पोहचवून ‘मराठी भाषेला’ आणखी समृद्ध करण्याची आपली जबाबदारी असल्याचे उद्गार साहित्यिक व बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त अधिकारी उपेंद्र निकाळजे यांनी काढले.


     मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा वाचनालयात आयोजित साहित्यिक संवाद व कुसुमाग्रह यांच्या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, साहित्यिक सुभाष सोनवणे, पत्रकार व कवी गिताराम नरवडे, कवी चंद्रकांत पालवे, साहित्यिक प्रा.मेधा काळे, शिल्पा रसाळ, गौरी जोशी, संचालक किरण आगरवाल, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, राहुल तांबोळी, ग्रंथपाल अमोल इथापे उपस्थित होते.


     प्रा.शिरिष मोडक यांनी प्रास्तविकात ‘साहित्यिकांच्या आजच्या सुसंवादनातून साहित्यिक चळवळ आणखी वृद्धींगत होईल, असा विश्वास व्यक्त केला. कवी चंद्रकांत पालवे यांनी उपस्थि साहित्यिकांच्या साहित्यविषयी माहिती दिली.


     मान्यवरांचे स्वागत प्रा.शिरिष मोडक, दिलीप पांढरे, किरण आगरवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका शिल्पा रसाळ यांनी केले. आभार ग्रंथपाल अमोल इथापे यांनी मानले. यावेळी साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन रसिक वाचकाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, कुमार गुंटला, दिलीप शहापुरकर, संकेत फाटक यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.