Header Ads

Ashok Chavan: अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश 15 फेब्रुवारीला होणार होता परंतु ; मुलीसाठी भाजपचा हा प्लॅन तयार

Ashok Chavan: अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी रोजी होणार होता परंतु  

Ashok Chavan: अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी रोजी होणार होता परंतुभाजपा प्रदेश कार्यालयात दुपारी अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी भाजपाच्या कार्यालयात जय्यत तयारी सुरू आहे. अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी रोजी होणार होता. परंतु  : अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी रोजी होणार होता. पण अचानकपणे त्यांचा पक्ष प्रवेश आजच होत आहे. राज्यसभेसाठी नामांकन देण्याची अखेरची तारीख एका दिवसावर आलीय. त्यामुळं चव्हाण राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा सुरू आहेत.

मुलगी श्रीजया यांना विधानसभेवर घेण्याचा प्लॅन? : अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवून त्यांची मुलगी श्रीजया यांना विधानसभेवर घेण्याचा प्लॅन भाजपाकडून तयार झाला असल्याची माहिती मिळत आहे. तसंच राज्यात भाजपाचं सरकार आल्यास श्रीजया यांना मंत्रीपदही मिळणार असल्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अजूनही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

 अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच हात सोडला  अशोक चव्हाण यांचे वडील, माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी राज्यात काँग्रेस वाढवली होती. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अशोक चव्हाण यांनीही काँग्रेससाठी खूप कष्ट केले आणि पक्षानेही त्यांना भरपूर दिले मोठं मोठया पदा वर चव्हाण यांनी काँग्रेस तर्फे काम केले आणि एक एकनिष्ठ काँग्रेसचा नेता भाजपात जात असल्याची चर्चा आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.