Ashok Chavan: माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा ; नाना पटोले दिल्लीला रवाना

Darshak
0

Ashok  Chavan: मुंबई :  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता.

 याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. 

यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरताना दिसत आहे. 

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा  नाना पटोले दिल्लीला रवाना  झाल्याची माहिती सूत्रांनी दिली 

Ashok  Chavan: माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा ; नाना पटोले दिल्लीला रवाना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा व्हिडिओ

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले काय म्हणाले पहा त्यांच्या ट्विरवर

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)