Header Ads

Award: पोस्टल डिव्हिजन सोसायटीला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार प्रदान

पोस्टल डिव्हिजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पगारदार पतसंस्था पुरस्कार प्रदान

 

पोस्टल डिव्हिजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पगारदार पतसंस्था पुरस्कार प्रदान

  अहमदनगर (प्रतिनिधी)  - कोल्हापूर येथील अवीज पब्लिकेशन वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘बँको ब्ल्यू रिबन’ पगारदार पतसंस्था पुरस्कार अहमदनगर पोस्टल डिव्हिजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला प्रदान करण्यात आला.  माजी सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन रामेश्‍वर ढाकणे, व्हाईस चेअरमन सुनील कुलकर्णी, माजी चेअरमन निसार शेख, दत्तात्रय जासूद, संचालक महेश तामटे यांनी स्वीकारला.  दरवर्षी राज्यातील पतसंस्थांना उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे वितरण नुकतेच दमण येथे झाले.

             राज्य कार्यक्षेत्र असलेल्या अहमदनगर पोस्टल सोसायटीस  बँको पुरस्कार मिळण्याचे हे तिसरे वर्ष असून यापूर्वी 2020 व 2021 या वर्षात संस्थेस पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या पुरस्काराकरिता संस्थेची आर्थिक परिस्थिती, सामाजिक कार्य, ऑडिट वर्ग, सभासदांच्या ठेवी, दिलेले कर्ज व थकबाकीचे प्रमाण प्रति कर्मचारी व्यवसाय कामकाजाची पद्धत यासह एकूण 17 निकषावर खरे उतरत संस्थेला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

             संस्थेला पुरस्कारा प्राप्त करण्यासाठी सेक्रेटरी प्रफुलकुमार काळे, संचालक प्रमोद कदम, किशोर नेमाने, अमित कोरडे, बळी जायभाय, सलीम शेख, शिवाजी कांबळे, अर्चना दहिंडे, स्वप्ना चिलवर , व्यवस्थापक नितीन वाघ आदींनी प्रयत्न केले.

              पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सभासद सुनील भागवत, सचिन देवकाते, अरविंद वालझाडे, देवेंद्र शिंदे, दिलीप खरात, बलराम दाते, आनंद भोंडवे, दीपक जसवाणी, संदीप मिसाळ, सुखदेव पालवे, अंबादास सुद्रिक, अजय आगळे, धनंजय दैठणकर, रमजान पठाण, गणेश केसकर, अकिल सय्यद, सतीश येवले, शरद नवसुपे, देविदास गोरे, सुनील धस, इरफान पठाण, जय मडावी, अर्जुन जटाळे, रमेश मगर, बापूराव पंडित, वेदशास्त्री वाकळे, सुभाष चव्हाण, महेश क्षिरसागर, दिगंबर शिंदे, नवनाथ शिंदे, राजेंद्र कोल्हे, प्रवीण कोल्हे, गणेश कोल्हे, अमोल बोरुडे, दीपक भुसारे आदिंसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.