Header Ads

Award: नूरील भोसले यांच्या चित्रास राज्य सरकारचा पुरस्कार

Award:  प्रगत कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नूरील भोसले यांच्या चित्रास राज्य सरकारचा पुरस्कार


Award:  प्रगत कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नूरील भोसले यांच्या चित्रास राज्य सरकारचा पुरस्कारराज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील समारंभात प्रदान 


अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्य सरकार व कला संचालनालय यांनी आयोजित केलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात (कलाकार विभाग) नगरमधील प्रगत कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नूरील प्रभात भोसले यांच्या चित्राला ५० हजार रुपये व मानपत्र असा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या समारंभात नूरील भोसले यांनी हा पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वीकारला.

राज्य कला प्रदर्शन १३ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जहांगीर कला दालनात खुले आहे. त्याचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष संजय नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, कला संचालक राजीव मिश्रा यावेळी उपस्थित होते.या प्रदर्शनासाठी राज्यातून एकूण ८९६ कलाकृती प्राप्त झाल्या होत्या. 

त्यातून २३९ कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. या निवड झालेल्या कलाकृतीतून पारितोषिकांसाठी १५ कलाकृतींची निवड करण्यात आली. ५० हजार रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी प्राचार्य भोसले यांच्या चित्रास पुरस्काराबरोबरच त्यांच्या चित्राची स्मरणिकेवरील मुखपृष्ठासाठी निवड करण्यात आली.

यापुर्वी हाच पुरस्कार त्यांना 2009 मध्ये ही मिळाला होता. असे बरेच पुरस्कार त्यांना मिळाले असून त्यात प्रामुख्याने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबई, आर्ट सोसायटी साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर, आर्ट रिन्यूअल सेंटर न्यूयॉर्क अशा प्रमुख पुरस्कारांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.