Header Ads

Award: विजय मते यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

 Award: विजय मते यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

Award: विजय मते यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान


   अहमदनगर (प्रतिनिधी) - शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध समस्यांचे अभ्यासपूर्वक लिखाण करुन समाजातील अन्याय, अत्याचाराविरुद्ध निर्भिडपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठविला. समाज सुधारण्यांसाठी मोलाचा वाटा उचलला. 


या कार्याची दखल घेऊन दोस्ती फाऊंडेशन, अहमदनगर यांच्यावतीने विजय मते यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2024 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


     नगर येथे राज्यस्तरीय बाल-काव्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, क्रीडा, पत्रकारिता क्षेत्रात काम करणार्‍यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.


     राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे यांचे हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक, शाला श्रीफळ देऊन श्री.मते यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दोस्ती फौंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख, धोंडीरामसिंह राजपुत, सुभाष सोनवणे, प्रशांत वाघ आदिंसह मान्यवर उपस्थित होते.


     गेल्या 35 वर्षांपासून वृत्तपत्र वितरणाचे काम व पत्रकारितेचे व्रत सेवा म्हणून केले. इ.12 वी मध्ये असतांना दा.प.आपटे पत्रकारिता पुरस्कार दिवंगत अर्थमंत्री मधु दंडवते यांच्या हस्ते मिळाला होता. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली, असे श्री.मते यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.