Header Ads

Bhaskar Jadhav | निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक ; राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा

  Bhaskar Jadhav | निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक ; राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा

Bhaskar Jadhav | निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक ; राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा  Bhaskar Jadhav | रत्नागिरी : भाजप नेते निलेश राणे गुहागर येथील सभेसाठी जात असताना चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे  यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.अखेर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.


मुंबई गोवा महामार्गावर भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालयाजवळ निलेश राणे यांच्या गाड्यांवर दगडफेक झाली. त्यामुळे ठाकरे आणि राणे समर्थक एकमेकांसमोर आले. सुमारे तासभर हा राडा सुरू होता. अखेर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगविले.


या सगळ्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे. मुंबई गोवा महामार्ग परिसर तसेच चिपळूण शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळातच गुहागर शृंगारतळी येथे निलेश राणे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी निलेश राणे चिपळूणकडून गुहागरच्या दिशेने निघाले असताना हा सगळा प्रकार घडला आहे.साभार सौजन्य  ZEE २४ तास  

 

साभार सौजन्य News18Lokmat 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.