Bhingar Congress: रमाईंचे त्यागी जीवन कार्य प्रत्येक अनुयायींना प्रेरणादायी -बाळासाहेब भिंगारदिवे

Darshak
0

 भिंगार काँग्रेस च्यावतीने माता रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन

Bhingar Congress: रमाईंचे त्यागी जीवन कार्य प्रत्येक अनुयायींना प्रेरणादायी -बाळासाहेब भिंगारदिवे
     अहमदनगर (प्रतिनिधी) - भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने  माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती त्यांच्या प्रतिमा पुजन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, कार्याध्यक्ष बाळासाहेब भिंगारदिवे, उपाध्यक्ष संतोष धिवर, प्रशांत भिंगारदिवे, अभिजित भिंगारदिवे, पिंटु उबाळे, आकाश गायकवाड, पंकज शेलकर आदी उपस्थित होते.


     याप्रसंगी बाळासाहेब भिंगारदिवे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन फार संषर्घमय राहिले. अनेक संकटांना सामना करत प्रतिकुल परिस्थितीत आपले कार्य सुरु ठेवले. या त्यांच्या प्रवासात पत्नी रमाबाईंनी मोलाची साथ दिली. 


त्यामुळेच अनेक आघाड्यांवर डॉ.बाबासाहेब यशस्वी झाले. घरातील अनेक समस्यांना तोंड देत घरातील सर्व नातेवाईकांची उत्तम तर्‍हेने सेवा केली. डॉ.बाबासाहेबांकडे येणार्‍यांनाही त्या आदर देत. रमाईंचे त्यागी जीवन कार्य प्रत्येक अनुयायींना प्रेरणादायी राहील, असे सांगितले.


     याप्रसंगी सागर चाबुकस्वार यांनीही माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्षमय प्रसंग सांगितले. शेवटी संतोष धिवर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)