Header Ads

Bhingar News: भिंगारला स्वच्छता अभियान व वृक्षरोपणाने संत गाडगे महाराज जयंती साजरी

 सार्वजनिक स्वच्छता प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य -संजय सपकाळ

Bhingar News: भिंगारला स्वच्छता अभियान व वृक्षरोपणाने संत गाडगे महाराज जयंती साजरीअहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्क व परिसराची हरदिनच्या सदस्यांनी स्वच्छता करुन कृतीतून गाडगे महाराजांना अभिवादन करुन स्वच्छ व सुंदर भारत घडविण्याचा व वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.


प्रारंभी किरण पतके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अशोक लोंढे, काशिनाथ शिंदे, सुमेश केदारे, मेजर दिलीप ठोकळ, दीपक अमृत, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, बापूसाहेब तांबे, दीपक धाडगे, दिलीप गुगळे, अशोक पराते, अभिजीत सपकाळ, विलास तोतरे, संजय भिंगारदिवे, चुनीलाल झंवर, विकास भिंगारदिवे, ज्ञानेश्‍वर पवार, सुंदरराव पाटील, सरदारसिंग परदेशी, राजू कांबळे, विठ्ठल राहिंज, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, संतोष लुनिया, रमेशलाल कोठारी, जालिंदर बेल्हेकर, जालिंदर अळकुटे, कुमार धतुरे, किशोर भगवाने, एकनाथ जगताप, देविदास गंडाळ, गोकुळ भांगे, अशोक भगवाने, योगेश चौधरी, विलास मिसाळ, विकास निमसे, अजय खंडागळे, संजय नायडू, रमेश धाडगे, सुनील धाडगे, कन्हैया परदेशी, रोहिदास नामदे, तुषार घाडगे आदी ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, संत गाडगे महाराजांनी त्याकाळी स्वच्छतेचे महत्त्व जाणून समाजात जागृती केली.सार्वजनिक स्वच्छता ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांचे देखील कर्तव्य आहे. युवकांसह नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेला चळवळीचे स्वरुप दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होणार आहे. सार्वजनिक स्वच्छता ही एका दिवसा पुरती मर्यादित न ठेवता दररोज नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज आहे.


ग्रुपच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व आरोग्य चळवळ वर्षभर सुरु असल्याची त्यांनी माहिती दिली. संत गाडगे महाराजांच्या जयंती दिनी हरदिनच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांना जोडून पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य चळवळला चालना देण्याचा संकल्प व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.