Header Ads

रविवारी ११ फेब्रुवारीला गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्सव

 रविवारी ११ फेब्रुवारीला गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्सव

रविवारी ११ फेब्रुवारीला गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्सव

 

           अहमदनगर (प्रतिनिधी) -नाथ संप्रदायात सर्वात महत्वाचा उत्सव असणारा धर्मनाथ बीज परंपरेनुसार व धार्मिक महत्व असलेल्या नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर  रविवार दि ११ फेब्रुवारीला  होत असून त्यानिंमताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  
          गोरक्षनाथ महाराज ढोकणे, उंबरे यांच्या अधिपत्याखाली रविवार    सकाळी ८ ते १० वाजेपर्यत महापूजा व अभिषेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर स १० ते १२ यावेळेत आदिनाथ महाराज दानवे,घाट देऊळगाव  यांचे कीर्तन होणार आहे तर दुपारी १२ पासून पुढे असंख्य  नाथ भक्ताच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.पहाटेपासून दिवसभर मोठ्या संख्नेने भाविक उत्सवाला येतील.

   
       धर्मनाथ बीजचे धार्मिक महत्व पुढील प्रमाणे आहे मच्छिन्द्रनाथ व गोरक्षनाथ भ्रमण करत प्रयाग राज्यात गेले असता तेथील त्रिविक्रम राजाला मुलबाळ नव्हते व ते लोककल्याणकारी राजा होता,त्याचे देहांत झाले हे पाहून गोरक्षनाथ अत्यन्त दुःखी झाले त्यांनी गुरु मच्छिन्द्रनाथांना राजाला पुन्हा जिवंत करवायची विंनती केली आपण नाही केले तर मी अग्नी काष्ठ घेईल असे सांगितले त्तेव्हा मच्छिन्द्रनाथांनी मृत राजाच्या शरीरात काया प्रेवेश केला त्यामुळे राजा जिवंत झाला त्यानंतर राजाने पुन्हा १२ वर्ष राज्य केले.

            
 मच्छिन्द्रनाथ पासून धर्मनाथाचा जन्म झाला धर्मनाथ १२ वर्षाचा झाल्यावर पुन्हा मच्छिन्द्रनाथ त्रिविक्रम राजाच्या देहातून बाहेर पडले व धर्मनाथाचा राज्याभिषेक करून प्रयागचा राजा केले व १२ वर्षांनी गोरक्षनाथ येऊन धर्मनाथास अनुग्रह देतील असे सांगितले १२ वर्षांनी मच्छिन्द्रनाथ व गोरक्षनाथ यांनी पुन्हा प्रयाग येथे येऊन माघ शु द्वितीयाला गोरक्षनाथांनी धर्मनाथाना सभारंभपूर्वक नाथसंप्रदायाची दीक्षा दिली व हा दिवस धर्मनाथ बीज म्हणून साजरा करण्याचा आदेश दिला म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे.

 
             गोरखनाथगड स्थानाबाबत  नवनाथ भक्तिसार मध्ये या ठिकाणाचे महत्व सांगितले आहे,वर्षभर भाविक व पर्यटक या ठिकाणी रोज येत असतात.येथील स्मृतीमंदिराचे काम पूर्ण झाले आहे धर्मनाथ बीजेच्या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष ऍड शंकरराव कदम,मांजरसुंभा ग्रामस्थ व भाविकांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.