Civil Hospital Ahmednagar: पुढील गुरुवार पासून बंद असलेले वयाचे दाखले देणं चालू करणार - डॉ.संजय घोगरे

Darshak
0

 Civil Hospital Ahmednagar: भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या निवेदनाला यश


Civil Hospital Ahmednagar: भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या निवेदनाला यश
     अहमदनगर (प्रतिनिधी)  -    शासनाचे परिपत्र असल्यामुळे मागील काही आठवड्यापासून जिल्हा रुग्णालयातून वयाचे दाखले देणं बंद केल्याचे समजल्यानंतर भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्यावतीने  सिव्हिल सर्जन डॉ.संजय घोगरे  यांना निवेदन देऊन जेष्ठ नागरिकांना कशा प्रकारे अडचणीना तोंड द्यावे लागते. 


आपण वयाचे दाखले देणं बंद केल्यास संजय गांधी निराधार योजनेपासून बरेच लाभार्थी वंचीत रहातील. गोरगरीब, दिव्यांग, वृद्ध, निराधार यांना पेन्शन न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ येईल, तरी कृपया वयाचे दाखले पूर्ववत चालू करावे अशी विनंती यावेळी निवेदनद्वारे करण्यात आली.


          यावेळी भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा अध्यक्ष वसंत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडखे, संघटनेचे पदाधिकारी रमेश बोठे, तुकाराम भुजबळ, गोकुळ भुजबळ, सिंधूबाई मेहेत्रे, मथुरा बोडखे, तुकाराम भुजबळ, लक्ष्मी नाना खेडेकर, गोरख भुजबळ, अशोक खेडेकर, संजय बोडखे, विशाल बोडखे, राहिबाई नेटके आदि उपस्थित होते.


     डॉ. संजय घोगरे यांनी सर्वं बाजू तपासून घेऊन, शक्यतो वयाच्या दाखला म्हणून स्वयंघोषणा पत्र चालू शकेल व योजनाचा लाभ संबंधिताना मिळू शकेल, असे सांगितले. परंतु आम्ही योजनेसाठी हा पुरावा ग्राहय होणार नाही व सदर प्रकरणे नामंजूर होतील व लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान होईल, असे सांगितले. 


त्यावर सिव्हिल सर्जन साहेबांनी आमची मागणी मान्य करून. पुढील गुरुवार पासून खिडकी क्रमांक 27  वरून पूर्ववत वयाचे दाखले देणे चालू करण्याच्या सूचना संबंधित कर्मचारी यांना देण्यात येईल, असे सांगितले.


     दिव्यांग, विधवा,परितक्ता,निराधार,माता भगिनीं, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी असणारी संजय गांधी निराधार अनुदान रु.1500/-  चा लाभ मिळण्यासाठी वयाची अट आहे. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असेल तर, जिल्हा रुग्णालय येथून मिळणार्‍या दाखल्याची आवश्यकता असते. आज गुरुवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिक आले असता. 


सदर 27 नंबर येथून वयाचे दाखले बंद झाले असे सांगण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ पुरुष व माता भगिनीं यांची अडचण झाल्यामुळे त्यांनी आम्हाला फोन करून सर्व परिस्थितीचा टाहोच फोडला व आम्ही भाडे खर्च करून बाहेर गावाहून आलो आहोत, असे सांगितले. 


त्यानंतर भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन परिस्थिती मांडली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत पुढील गुरुवार पासून दाखले देणे सुरु होईल, असे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)