Header Ads

Free Health Camp: दि.9 फेब्रुवारी रोजी मोफत मोतीबिंदू आरोग्य तपासणी शिबीर

 Free Health Camp: दि.9 फेब्रुवारी रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र,दंत व आरोग्य तपासणी, औषधे वाटप शिबीर 

Free Health Camp: दि.9 फेब्रुवारी रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र,दंत व आरोग्य तपासणी, औषधे वाटप शिबीर
  अहमदनगर (प्रतिनिधी) - श्री एकदंत गणेश मंदिरातर्फे  शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी 2024  रोजी स. 10 ते दु.3 या वेळेत दातरंगे मळा,एकदंत कॉलनी, अ.नगर येथे मोफत नेत्र,दंत व आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषधे वाटप  शिबीराचे आयोजन करण्यात आले.

 आज संगणक, टीव्ही व प्रदुषणमुळे डोळ्यांवर व आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. काही शहरी व ग्रामीण भागात डोळ्यांची व आरोग्याची निगा राखण्यामध्ये जनतेचे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यातच मोतीबिंदू सारख्या सुमारे 10 ते 12 हजार रुपयांच्या शस्त्रक्रिया सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या असतात. म्हणून आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे. 

एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय,पुणे यांच्या सहकार्याने हे शिबीर होणार आहे. नेत्रतपासणीपासून ते मोतीबिंदू पर्यंतचे सर्व सोपस्कार मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये रुग्णांचा नगर ते पुणे प्रवास, भोजन, निवास व काळा चष्मा आदि बाबींचा समावेश आहे, शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांवर पुण्यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

 तसेच मोफत आरोग्य तपासणी, दंत तपासणी  व औषध वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य तपासणीसाठी  डॉ.प्रशांत सुरकूटला, डॉ.शाम गुरुड आणि दंत तपासणीसाठी डॉ.प्रतीक्षा कोडम हे तज्ञ डॉक्टार रुग्णांची तपासणी करुन योग्य ते मार्गदर्शन करुन औषधे वाटप करणार आहेत. रुग्णांनी  शिधा पत्रिका झेरॉक्स सोबत आणावी, सध्या चालू असलेले औषध व गोळ्याही बरोबर आणाव्यात.

रुग्णांसाठी नावनोंदणी आवश्यक असून जालिंदर बोरुडे मो.9881810333,श्रीनिवास बुरगुल  मो.9518913080, विकास मारपेल्ली मो.8087321706, सौ.स्वाती गाजेंगी मो.7276887481, सौ.विनोदा बेत्ती मो.9270684741,

 एच.व्ही.देसाई रुग्णालयाचे शुभम बोज्जा मो.9028440404 यांच्याशी संपर्क साधावा. तरी रुग्णांनी या मोफत तपासणी शिबीराचा व शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी  केले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.