Header Ads

Ganesh Jayanti Ahmednagar: गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंडळाची शहरातुन भव्य पालखी मिरवणुक


मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग व मंडळाच्या सर्व  कार्यकर्त्यांनी एक सारखे कपडे परिधान केल्याने नगरकांचे लक्ष वेधले 

Ganesh Jayanti Ahmednagar: गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंडळाची शहरातुन भव्य पालखी मिरवणुक
अहमदनगर (प्रतिनिधी) - गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंडळाच्यावतीने नगरशहरातुन भव्य पालखी मिरवुणक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता. मंडळाच्या सर्व पुरुष सर्व कुडते व महिला कार्यकर्त्यांनी  एक सारख्या साड्या परिधान केल्याने  नगरकरांचे लक्ष वेधले. मिरवणुक मार्गावर रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीमध्ये सामाजिक संदेश देणारे घोषवाक्य काढण्यात आले. जेणे करुन रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश जाईल म्हणुन मिरवणुक मार्गावर आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली. पालखीस फुलांची सजावट करण्यात आली. मिरवणुकीत 800 महिला व पुरुषांचा सहभाग होता. 


गणेश जयंती निमित्त एकदंत कॉलनी, दातरंगे मळा येथील एकदंत गणेश मंदिरात सकाळी महाअभिषेक व होमहवन करण्यात आले. त्यानंतर पालीखची महापुजा करुन भव्य पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सर्वत्र पालखीचे स्वागत भावकांनी केले. या पालखली मिरवणुकीत महिलांनी एकसारख्या साड्या परिधान करुन सांस्कृतिक कार्यक्रम बत्कम्मा व लेझिम खेळ खेळला. तरुण कार्यकर्त्यांनी लाठीकाठी व लेझिम खेळतुन मिरवणुकीची शोभा वाढवत होते. पालखी मिरवणुक वाजत गाजत चालल्याने शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. श्री मार्कंडेय मंदिरात मिरवणुक आली असता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व भावी भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. ही शोभायात्र दारतंगे मळा, दिल्लीगेट, नवरंग व्यायाम शाळा रोड, शितळे देवी मंदिर रोड, बागडपट्टी रोड, नेता सुभाष चौक, मार्कंडेय मंदिर, गांधी मैदान, चितळे रोड, चौपाटी  कारंजा, नालेगांव, वाघगल्ली, पुन्हा दातरंगे मळा या प्रमुख मार्गावरुन बॅण्ड पथक, लेझिम, सांस्कृतिक बत्कम्मा यांच्यासह  निधाली. गणेश जयंती निमित्त एकदंत गणेश मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रम 5 दिवसापासुन विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबीर 102 युवकांनी रक्त संकलन केले.आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबीर, नेत्रतपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीर, 100 दप्तर वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम बत्कम्मा, डान्स मनोरंजन कार्यक्रम, हनुमान चालिसा, दंतरोग तपासणी शिबीर असे उपक्रम राबविण्यात आले. तसेच गणेश जयंती निमित्ताने सामुदायिक विवाह सोहळ्यात एक जोडपी विवाहबद्ध होणार आहे.


पालखी मिरवणुक व विविध कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व एकदंत गणेश मंडळ व परिवाराचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.