Header Ads

Ganj Bazar: गंज बाजारातील मुंजोबा विशाल गणेश मंदिराचा रौप्य महोत्सव : गणेश जन्मोत्सव

 गंज बाजारातील मुंजोबा विशाल गणेश मंदिराचा रौप्य महोत्सव : गणेश जन्मोत्सव

Ganj Bazar: गंज बाजारातील मुंजोबा विशाल गणेश मंदिराचा रौप्य महोत्सव : गणेश जन्मोत्सव     अहमदनगर (प्रतिनिधी)   - अहमदनगर शहरातील गंज बाजार येथील शेंगा गल्लीत 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री विशाल गणपतीच्या एकमेव प्रतिमुर्ती असलेल्या मुंजोबा विशाल गणेश मंदिराचा रौप्य महोत्सव व गणेश जन्मोत्सव सोहळा मंगळवार दि. 13 रोजी साजरा होत आहे.


     मंगळवारी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत मंदिरात गणेश याग, अभिषेक, महापुजा, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.  तसेच पुर्णाहूती व महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन सांगता होईल. याबाबत अधिक माहिती अशी के, माळीवाडा येथे असलेल्या श्री विशाल गणपतीप्रमाणे एकमेव प्रतिमुर्ती 25 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आली होती.


     गंज बाजारातील या मंदिरात जन्मोत्सवा बरोबरच मंदिराचा रौप्य महोत्सव साजरा होणार आहे. गेली 25 वर्षे या मंदिरात दरवर्षी जन्मोत्सव साजरा होतो. यावर्षी भव्य-दिव्य आकर्षक रांगोळी दिनेश मंजरतकर, विजय आहेर यांनी काढली आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते रांगोळी रेखाटून सेवा देत आहेत. या मुर्ती स्थापनेची संकल्पना मंदिराचे अध्यक्ष माजी सैनिक बाळासाहेब तथा नाना  भोरे यांची असून, मंदिराचे व्यवस्थापन प्रदीप कांकरिया, विक्रांत भोरे, ओंकार भोरे पाहत आहेत.

     कार्यक्रमासाठी सावेकर, कांकरिया, लोढा,  खंडेलवाल परिवार तसेच शेंगागल्ली, तापीदास गल्ली, डाळ मंडई, सराफ बाजार, गंज बाजार, येथील नागरिक, व्यापारी सहकार्य करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.