Header Ads

Hivre Bazar Ahmednagar: पर्यावरण रक्षणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -पद्मश्री पोपट पवार

 पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक क्षेत्रातील महिलांना देखील पुढाकार घ्यावा लागणार -पद्मश्री पोपट पवार

Hivre Bazar Ahmednagar: पर्यावरण रक्षणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -पद्मश्री पोपट पवारअहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटिव्ही कॅमेर बसवून देण्यात आले.

सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी हिवरेबाजार गावाला भेट देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पहाणी केली. शाळेची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने व त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी महिला सदस्यांनी हा उपक्रम राबविला.


आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बसवलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख सविता चड्डा, गिता नय्यर, अर्चना खंडेलवाल, स्विटी पंजाबी, निशा धुप्पड, शोभाताई पवार, सरपंच विमलताई ठाणगे, मुख्याध्यापक बाबा जाधव, ग्रुपच्या सर्व सदस्या सविता चढ्ढा, रिटा सलुजा, डॉली मेहेता,

 अनिता शर्मा, बीना बत्रा, रंजना झिंजे, डॉली भाटिया, कीर्ती बोरा, करुना मुनोत, विजया सारडा, दीपा चंगेडिया, रिद्धी मनचंदा, कैलास मेहेता, उषा धवन, आंचल बिंद्रा, मंगला झंवर, सोनिया ॲबट, अन्नू ॲबट, रुपा पंजाबी, मंगला पिडीयार, अनिता गाडे, कंचन नेहालानी, 

शिल्पा गांधी, अर्पण बोथरा, योजना बोठे, चैताली बोराटे, सुनीता गांधी, शीतल मालू, मनीषा लोढा, गीता शर्मा, संगिता ओबेराय आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.