Header Ads

Mahanand Milk: उद्या मुंबई गुजरातला देतील संजय राऊत यांची महानंद वरून टीका: काही लोकांच्या डोक्यावर परिणाम मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

Mahanand Milk: उद्या मुंबई गुजरातला देतील  राऊत यांची महानंद वरून टीका: काही लोकांच्या डोक्यावर परिणाम मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तरMahanand Milk : 
महाराष्ट्र सरकार महानंदचे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (NDDB) हस्तांतरण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दुसरीकडे महानंद डेअरी एनडीडीबीकडे देऊन या प्रकल्पाची सूत्रे गुजरातच्या हातात द्यायचा घाट घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आता महानंदच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. उद्या मुंबईसुद्धा गुजरातला देतील अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे

राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महानंदच्या हस्तांतरण प्रक्रियेवर प्रतिक्रिया दिली आहे. "महानंद हस्तांतरण प्रकरणी सोमवारी बैठक होणार आहे. पूर्वीच्या लोकांच्या गलथान कारभारामुळे कामगारांचा प्रलंबित पगार देण्यात येणार आहे. यासोबत 500 कामगारांना व्हीआरएस देण्याची प्रक्रियेवर बैठकीत चर्चा होणार आहे. जळगाव दूध संघ देखील हस्तांतरित करण्यात आला होता तो आता नफ्यात आल्यावर परत मिळालाय. गुजरातला प्रकल्प देत असल्याची आमच्यावर टीका होतेय. मात्र राज्यातील काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालाय. माहिती न घेता आरोप करण्याची ही पद्धत आहे. महानंदा महाराष्ट्रातच राहणार आहे. फक्त आज अडचणीत सापडली आहे. म्हणून तिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या संचालक मंडळाची सोमवारी बैठक बोलवण्यात आली आहे. आधी कामगारांचा प्रश्न आपण सोडवू," अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

सौजन्य साभार zee २४ तास 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.