Header Ads

Mahesh Babu: सुपरस्टार महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' 'या' दिवशी होणार ओटीटीवर रिलीज

 Mahesh Babu: सुपरस्टार महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' 'या' दिवशी होणार ओटीटीवर रिलीज

Mahesh Babu: सुपरस्टार महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' 'या' दिवशी होणार ओटीटीवर रिलीजमुंबई - Guntur Kaaram : 12 जानेवारी रोजी, बॉक्स ऑफिसवर एकूण पाच साऊथ आणि काही बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी दोन चित्रपट साऊथ चित्रपट 'गुंटूर कारम' आणि 'हनुमान'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. 'गुंटूर कारम' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता महेश बाबू होता, तर 'हनुमान'मध्ये प्रमुख भूमिकेत तेजा सज्जा होता. या दोन्ही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. दरम्यान महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' हा चित्रपट लवकरत ओटीटीवर रिलीज होत असल्याचं समजत आहे. ओटीटीवर रिलीज झाल्याच्या घोषणानंतर आता अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.'गुंटूर कारम' हा चित्रपट कधी होणार ओटीटीवर रिलीज : नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ही बातमी शेअर करण्यात आली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, ''राऊडी रमन आग लावण्यासाठी येत आहे. 'गुंटूर करम' नेटफ्लिक्सवर 9 फेब्रुवारीला तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.'' या पोस्टवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी कमेंटमध्ये फायर इमोजी वापरण्यास सुरुवात केली आहे. 'गुंटूर कारम' या चित्रपटाद्वारे महेश बाबू खूप दिवसांनंतर चाहत्यांना रुपेरी पडद्यावर दिसला आहे. 'गुंटूर कारम'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटानं देशांतर्गत 123 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय जगभरात बॉक्स ऑफिसवर 177.14 कोटीची कमाई या चित्रपटानं केली आहे.


'गुंटूर कारम' चित्रपटाबद्दल : 'गुंटूर कारम'मध्ये महेश बाबूशिवाय श्रीलीला, मीनाक्षी चौधरी, ब्रह्मानंदम,रम्या कृष्णन, जगपती बाबू, प्रकाश राज, आशीष विद्यार्थी, सुनील आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केलंय. 'गुंटूर कारम'ची निर्मिती एस. हरिका आणि हसीन क्रिएशन्स यांनी केली आहे. दरम्यान महेश बाबूच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं पुढं तो 'जन गण मन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. 'जन गण मन' हा पुरी जगन्नाध दिग्दर्शित असून या चित्रपटामध्ये महेश बाबू ॲक्शन करताना दिसणार आहे. हा तेलुगू चित्रपट आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.