Header Ads

Mararthi Bhasha: मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा - डॉ.अस्मिता अष्टेकर

 

Mararthi Bhasha: सायंतारा ग्रुपतर्फे मराठी अध्यापिका प्रा.डॉ.स्मिता भुसे यांचा सन्मान


Mararthi Bhasha: मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा - डॉ.अस्मिता अष्टेकर
     अहमदनगर (प्रतिनिधी)  - भाषा पक्की असेल तर जगातील कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो. मराठी भाषेतून शिक्षण घेताना नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवा म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची धडे देणे अनिर्वाय केले आहे, असे प्रतिपादन डॉ.अस्मिता अष्टेकर यांनी केले.


     अहमदनगर येथील मराठी शिक्षक संघटना राज्य सहसचिव प्रा.डॉ.स्मिता भुसे यांनी गेल्या 24 वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. याबद्दल मराठी दिनानिमित्त त्यांचा गुलमोहोर रोडवरील सायंतारा ग्रुपच्यावतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ.अस्मिता अष्टेकर, आरती खाडीलकर, पुजा पवार, झेबा शेख, गजानन जोशी, प्रमोद छाजेड, अभय गांधी, अजित चाबुकस्वार, किशोर रेणाविकर, श्रीकांत अष्टेकर आदि उपस्थित होते.


     डॉ.अष्टेकर म्हणाल्या, सारडा कॉलेजमध्ये गेली 24 वर्षे प्रा.डॉ.स्मिता भुसे मराठी विषयाचे अध्यापन करुन विद्यार्थ्यांना  ज्ञान आणि भाषा बाबत मार्गदर्शन करीत असल्याने मराठी भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर खूप मोठा बदल होऊन समाजाला त्याचा फायदा होईल, असे सांगितले.


     प्रा.डॉ.स्मिता भुसे या मराठी विषय संघटनेच्या राज्य सहसचिव आहेत. त्यांचे मराठी विषयावर विविध साहित्य प्रकाशित झाले असून, कविता संग्रह, समिक्षा ग्रंथ, शोध प्रकल्प, लघुकथा, विनोदी ललीत लेखन, केलेले आहे. अशा  या मराठी विषयी प्रेम, आदर असलेल्या स्मिता भुसे यांचा सन्मान आजच्या दिवशी होणे आवश्यक आहे, असे ग्रुपचे आरती खाडिलकर यांनी प्रास्तविकात सांगितले.सूत्रसंचालन झेबा शेख यांनी केले तर पुजा यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.