Header Ads

Maratha Samaj: छगन भुजबळ यांचा बोलवता धनी वेगळा आहे


Maratha Samaj:  सकल मराठा  बांधवांकडून आरोप 


Maratha Samaj: छगन भुजबळ यांचा बोलवता धनी वेगळा आहे

          अहमदनगर (प्रतिनिधी) -मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा  बांधवांकडून छगन भुजबळ यांच्या नगरच्या सभेतील आरोपांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्यात आले त्यामध्ये छगन भुजबळ हे केवळ सुपारी घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत.त्यांनी कुणाकडून सुपारी घेतली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असून त्याचा  बोलवता धनी वेगळा आहे ,अनाजी पंताच्या सुपारीवर छगन भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नयेत.त्यांचेच नेते असलेले अजित पवार यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे मग असे नेते छगन भुजबळ यांना कसे चालतात यावरून छगन भुजबळ  यांचा केवळ गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणालाच विरोध आहे असे म्हटले आहे.


              यावेळी ऍड गजेंद्र दांगट ,गोरख दळवीराम जरांगेगिरीश भांबरे,स्वप्निल दगडे,मिलिंद जपे,परमेश्वर पाटील,किशोर शिंदे,शशिकांत भांबरे,अभय शेंडगे,किरण दंडवते ,दत्तात्रेय वाबळे ,महेश घावटे उपस्थित होते यावेळी दुपट्टी भूमिका घेणारे ओबीसी नेतेमराठा आमदार नगर मधील एल्गार सभेत बोलायला तयार नसलेले स्थानिक नेते,नगरसेवकांनी फिरवलेली पाठ आदी त्यांनी सडकून टीका केली तर काहीचा नावानिशी उल्लेख केला.

 

                  नगर येथील ओबीसी यलगार सभेत छगन भुजबळ यांनी काही प्रमाणपत्रे भर सभेत दाखवली होती त्यावर देखील मराठा क्रांती मोर्चा कडून उत्तर देण्यात आलेले असूनस्वतः सत्तेत राहून जर असे गैरप्रकार झालेले आहेत तर छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी केवळ सभेमध्ये स्वतःच बनवलेली खोटी प्रमाणपत्रे दाखवत आपल्या समाज बांधवांची देखील दिशाभूल करू नये. संबंधित खोटी कागदपत्रे जर अधिकाऱ्यांनी बनवले असतील तर तुम्ही सत्तेत आहात सदर अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कुणाची वाट पाहात आहात ?  असे देखील आव्हान मराठा क्रांती मोर्चा कडून छगन भुजबळ यांना देण्यात आलेले आहे.

                छगन भुजबळ यांनी मराठा -ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नये असे देखील यावेळी भुजबळ यांना सुनावण्यात आले छगन भुजबळ यांनी राजीनाम्याबद्दलचे केलेले वक्तव्य देखील संभ्रम निर्माण करणारे असून वास्तविक त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे द्यायला पाहिजे होता मात्र अद्याप देखील ते त्याबद्दल सविस्तर बोलायला तयार नाहीत तर दुसरीकडे सरकारी गाडी सरकारी सुविधा आणि मंत्र्यांसाठी सगळ्या असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा ते लाभ घेत आहेत . स्वतःच्या एकाही संस्थेला महापुरुषांचे नाव देण्यात आले नाही मात्र स्वतःचे नाव देण्यात आलेले आहे यावर देखील मराठा क्रांती मोर्चा कडून लक्ष वेधण्यात आलेले आहे. नाभिक बांधवांचा आम्हाला पाठिंबा असून छगन भुजबळ यांनी नगर इथे येऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये ‘ असा देखील सल्ला मराठा क्रांती मोर्चा कडून त्यांना देण्यात आलेला आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.