Header Ads

Meherbaba Ahmednagar: मेहेरबाबा सेंटरचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेह मेळावा संपन्न

  Meherbaba Ahmednagar: मेहेरबाबा सेंटरचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेह मेळावा संपन्न

Meherbaba Ahmednagar: मेहेरबाबा सेंटरचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेह मेळावा संपन्न


             अहमदनगर (प्रतिनिधी)-  अहमदनगर मनपाची ऐतिहासिक सरोश बाग शेजारी,सरोश पेट्रोल पंप समोर आणि प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या फोर्स शोरूम पाठीमागे असलेल्या आंतरराष्ट्रीय अवतार  अवतार मेहेरबाबा अहमदनगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या १३० वा जन्मोस्तव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये  अहमदनगर सेंटरचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.


     यामध्ये अहमदनगर सेंटरने नाटिका सादर केली तर पंढरीनाथ भस्मे,प्रभावती पाटील,माधव कांबळे,दया कांबळे,जालू मेहेर,श्रीधर केळकर,रमेश जंगले,माधुरी साखला,मेहेर भुज्जी,रमाबाई कलचुरी,महेश खोपटीकर,सरिता जोशी,हेमा टेंभेकर,स्वराली जाधव,नीरज खाडे,मनोज सेठी,हरून शेख,अरुणा,छाया व मेघा यांनी भजन,मुलांचे डान्स ,नाटिका, नृत्य गाणे सादर केले गेले तसेच यावेळी बक्षीस वितरण संपन्न झाले.

 

     आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी नगर सेंटरचे उपाध्यक्ष वैभव जोशी,रमाबाई कलचुरी,दीपक थाडे,नितीन थाडे,मधुकर डाडर,लता थाडे,आशा वाघ,सुदाम वाघ,राहुल मुळे,संतोष पाटसकर याच्यासह पदाधिकारी व सदस्य तसेच अहमदनगरसह अमेरिका,लंडन,जर्मनी,पॅरिस,इटली,इराण,युरोप आणि आफ्रिका तसेच आशियाई देशातील  मेहेरप्रेमीं उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.