Header Ads

Meherbaba: अहमदनगरला मेहेरबाबाचा जन्मोस्तवास २४ फेब्रुवारी पासून प्रारंभ

  Meherbaba: अहमदनगरला मेहेरबाबाचा जन्मोस्तवास २४ फेबु पासून प्रारंभ

Meherbaba: अहमदनगरला मेहेरबाबाचा जन्मोस्तवास २४ फेबु पासून प्रारंभ


      

Meherbaba: अहमदनगर (प्रतिनिधी)-प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या फोर्स शोरूम पाठीमागे आणि झेंडीगेट अहमदनगर मनपाची ऐतिहासिक सरोष बाग जवळ सरोष पेट्रोलपंपा शेजारील अवतार मेहेरबाबा अहमदनगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या १३० वा जन्मोस्तव कार्यक्रम दि २४ फेबु पासून सुरु होत असून तो २७  फेबु पर्यत चालणार आहे अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी यांनी  दिली. 

                दि २४ फेबु सकाळी १० वा मेहेरबाबाच्या सप्तरंगी ध्वजाचे अनावरण रमाबाई कलचुरी यांचे हस्ते होणार आहेव भजने होणार आहेत. दि २५ ला पहाटे ६ वा अवतार मेहेरबाबा याचा जन्मोस्तव सोहळा होणार आहे.


 याप्रसंगी विविध कार्यक्रम होणार आहे अहमदनगरसह देशविदेशातील भाविक यावेळी गीते सादर करतील तर बाबा कार्याविषयी प्रवचन हि होणार आहे नंतर आरती प्रार्थाना व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल तर दुपारी मेहेराबादला नाटक होणार आहे.

 

          दि २६ रोजी संध्या ७ ते ९ पर्यंत इंटरनॅशनल म्युझिक,डान्स,आर्ट मध्ये पश्चिमात्य बाबाप्रेमीचे गायन,वादन होणार आहे,दि २७ रोजी संध्या ५ वा अहमदनगर सेंटरचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे यामध्ये भजन,मुलांचे डान्स व बक्षीस वितरण होणार आहे.

 

             तरी सर्व मेहेरप्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगर सेंटरचे उपाध्यक्ष वैभव जोशी व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.


मेहेरप्रेमी भक्तां माहितीसाठी  मेहेरबाबा यांची समाधी मेहेराबाद येथे आहे त्याचप्रमाणे मेहेर बाबा यांनी अहमदनगर शहरातील मध्यवस्तीत असणारे अहमदनगर मनपाच्या "ऐतिहासिक सरोष बागे" पाठीमागे आणि "सरोश पेट्रोल पंपा" शेजारी असलेल्या मेहेर बाबा केंद्रावर मेहेरबाबा यांना विशेष प्रेम होता आणि त्यामुळे त्यांनी शहरातील झेंडीगेट भागातील असणाऱ्या या केंद्रावर नेहमी आणि नियमित आपले जीवन व्यतीत केले आणि या केंद्रावरून देश विदेशातील आपल्या भक्तांना प्रेम,शांती आणि एकात्मतेचे धडे शिकवले आणि अहमदनगर शहरातील मध्यवस्तीतील केंद्र असूनही येथे एक विशेष शांतीचा आभास होतो त्यामुळे मेहेरभक्तानी याठिकाणी मेहर बाबांना कोणता अनुभव मिळाला ते याठिकाणी भेट देऊन आणि शक्य झाल्यास मुक्काम करून त्या विशिष्ट शांतीचा अनुभव घ्यावा समाधीचे ठिकाण मेहेरबाबा यांनी मेहराबाद निवडले परंतु "झेंडीगेट" येथील केंद्रावर नेहमी विशेष प्रेम ठेवले आणि याठिकाणी नेहमी राहिले.  याबाबत अनेक पुरावे आणि त्यांचे या केंद्रावरील असणारे विशेष प्रेम दर्शविणारे छायाचित्रे आजही अहमदनगरमध्ये आणि जगभर असणाऱ्या त्यांच्या भक्तांकडे उपलब्ध आहेत.   

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.