MIDC: राजाभाऊ यांच्या वाढदिवसा निम्मित दत्त क्षेत्रात विविध कार्यक्रम संपन्न

Darshak
0

 राजाभाऊ कोठारी यांच्या वाढदिवसा निम्मित दत्त क्षेत्रात विविध कार्यक्रम संपन्न 

MIDC: राजाभाऊ यांच्या वाढदिवसा निम्मित दत्त क्षेत्रात विविध कार्यक्रम संपन्न         अहमदनगर (प्रतिनिधी)-मधील मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने एमआयडीसीच्या मंगल दत्त क्षेत्रात राजाभाऊ कोठारी (श्री विश्वेश्वर स्वामी महाराज)यांचा वाढदिवस  मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला सकाळपासून ते रात्रीपर्यंत राज्यातील भाविकांनी शुभेछया देण्यासाठी गर्दी केली होती.एफ ७० मध्ये असलेले हे पुरातन क्षेत्र असून राजाभाऊ कोठारी हे मठाधीपती आहे त्याच्या हस्ते मंदिरात सकाळी श्रींचा महाभिषेकदुपारी श्रींची महाआरती त्यानंतर महाराजांचे दर्शन सोहळा,महाप्रसाद व भजन,प्रवचन संपन्न झाले.

 

          येताना कृपया पुष्पगुच्छ आणु नये त्यापेक्षा भाऊंच्याच प्रेरणेतून मंडळाच्या माध्यमातून चालणा-या विविध आध्यात्मिक,  वैद्यकीयशैक्षणिक,   सामाजिक,  सांस्कृतिककला व क्रीडा इ.उपक्रम तसेच मंदिर व मंदिर नुतनीकरण कार्यात आपला सहभाग तन-मन-धनाने  सेवेत सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले होते त्याप्रमाणे अनेकांनी शैक्षणिक साहित्य व वैद्यकीय साहित्य भेट म्हणून आणले होते भाऊंच्या वाढदिवसानिमित्त . कमलाकर काका तपस्वी यांचे पुतणे योगेश तपस्वी यांची भजन संध्या संध्याकाळी झाली.

 

         यावेळी बोलताना कोठारी म्हणाले सर्वांचे माझ्याप्रती असणारे  प्रेम,सन्मान व आदराने मी भारावून गेलो आहे पण मी विचार करतो मी यासाठी पात्र आहे का नाही?हा संशोधनाचा विषय आहे कारण मी माणूस आहे मी वेगळा नाही माणसाने माणसासारखे कसे जगले पाहिजे तसे जगतो,येथे  दत्तप्रभूंच्या दरबार मध्ये आहे,येथे कुठलीही दोरी बांधलेली नाहीकुठलं हे काही नियम नाहीत म्हणून दर्शन घ्यायला आडकाठी नाही आपले हे स्थान ४० वर्षपूर्वीचे आहे तेव्हापासून भाविक येथे दर्शनाला येत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)