Mirawali Dargah: मिरावली पहाड दर्गा छोटेबाबा यांचा दि.12 व 13 रोजी संदल-ऊरुस

Darshak
0

 Mirawali Dargah: मिरावली पहाड दर्गा येथे ह.जलालबाबा उर्फ छोटेबाबा यांचा दि.12 व 13 रोजी संदल-ऊरुस

Mirawali Dargah: मिरावली पहाड दर्गा छोटेबाबा यांचा दि.12 व 13 रोजी संदल-ऊरुस   अहमदनगर (प्रतिनिधी) - मौजे कापुरवाडी येथील हजरत सय्यद जैनुल आबेदीन जलालबाबा उर्फ छोटेबाबा मिरावली पहाड दर्गा यांचे सालाबादप्रमाणे संदल-ऊरुसाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 12/2/2024 उर्दू ता. 1 शाबान हिजरी 1445 रोजी संदल व मंगळवार दि. 13/2/2024 उर्दू ता.2 शाबान हिजरी 1445 रोजी ऊरुस कार्यक्रम संपन्न होणार आहे.


     संदल निमित्त सोमवार दि. 12/2/2024 रोजी पहाटे फुलाची चादर, गलेफ व संदल दर्गावर चढविला जाईल. तसेच मंगळवार दि.13/2/2024 रोजी सकाळी मिरावली पहाड येथे ऊरुसानिमित्त संदल व प्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


     सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले जागृत मिरावली दर्गा येथे भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण होत असून दूरदूरहून भाविक नवस फेडण्यासाठी येतात व दर्शनासाठी येतात.


     तरी सदल ऊरुसाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी सहभागी होऊन संदलचा, प्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा ट्रस्टचे वंशावळ विश्वस्त आसिफखान पीरखान पठाण, चेअरमन हाजी अन्वर खान (पत्रकार), विश्वस्त सय्यद हमीद रुस्तुम तसेच दर्गाचे खादीम मुजावर यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)