Header Ads

Retired Teachers: सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकांना चौथा हप्ता देण्याचे शासन आदेश निर्गमित


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघाने मानले आभार


Retired Teachers: सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकांना चौथा हप्ता देण्याचे शासन आदेश निर्गमित
     अहमदनगर (प्रतिनिधी)  - 7 व्या वेतन आयोगाचा थकित चौथा हप्ता व तिसरा हप्ता ऑनलाईन फेब्रुवारी 2024 मध्ये देण्याचे आदेश  दि.29 जानेवारी 2024 रोजी शिक्षण संचालनालय, पुणे यांनी शिक्षणाधिकार्‍यांना निर्गमित केले आहेत.


     या निर्ययाबद्दल अहमदनगर सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कल्याणकारी संघाने दि.23 जानेवारी रोजी मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले होते. 25 जानेवारी रोजी सचिवालय स्तरावर वरील आदेश निर्गमित करुन देण्यात आला होता. 


त्याबद्दल सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश जाधव, सचिव रोहिदास कांबळे, उपाध्यक्ष एकनाथ जगताप, ज्येष्ठ सदस्य प्रभाकर खणकर यांनी शासनाचे मन:पुर्वक आभार मानले आहेत.


     यापुर्वी सेवानिवृत्तांना जे 1/1/2016 नंतर सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांना 2019 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू झाला. मागील फरक पाच टप्प्यात देण्याचे शासनाने मान्य केले होते. तीन हप्ते यापुर्वी मिळाले आहेत. 


आता फक्त पाचवा हप्ता मिळणे बाकी आहे. 31 जुलै 2024 मध्ये तो देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात तरतूद होवून तो हप्ता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.