Header Ads

Shikshak Adhiveshan: निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

 प्राथमिक शिक्षक संघाचा महामेळावा व त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न 

Shikshak Adhiveshan: निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार-शिक्षणमंत्री दिपक केसरकर       अहमदनगर (प्रतिनिधी)-राज्यभरातील प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असून निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार असून मुख्यालयी राहण्याची अट कायमस्वरूपी रद्द केली जाईल,तसे आदेश देणे बाबतची कार्यवाही तातडीने केली,असे आश्वासन नगरमधील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात ऑनलाइन संबोधत करताना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.अध्यक्षस्थानी महासंघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात होते.


        नगरमधील कल्याण रोडवरील मंगल कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात जिल्हाभरातून आलेल्या शिक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत मंत्री केसरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. संभाजीतात्यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक संघ राज्यात सक्षमपणे काम करत असून संघाच्या व्यासपीठावरील प्रश्न तातडीने निकाली काढले जातील असेही ते म्हणाले.


      यावेळी खासदार सुजय विखे,आमदार संग्राम जगताप,माजी आमदार सुधीरजी तांबे,माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर,शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,राज्यनेते संभाजीतात्या थोरात,राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब झावरे,राष्ट्रीय संघटक रावसाहेब सुंबे,जेष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहकले,डॉ.संजय कळमकर,चांगदेव ढेपले,संगीता कुरकुटे,आबासाहेब जगताप,जयश्री झरेकर,स्वाती झावरे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके,बाळासाहेब देंडगे,अमोल साळवे,कृष्णमुरारी गाडे,रमेश कांडेकर आदीसह राज्यातून आलेले असंख्य शिक्षक,कार्यकर्ते उपस्थित होते.


       खासदार सुजय विखे,आ संग्राम जगताप यांनी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत स्वतःलक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढला जाईल असे सांगितले.खालील मागण्या बाबत लवकरच निर्णय होईल असे ते म्हणाले मुख्यालयाची अट पूर्णपणे रद्द करणार,MSCIT कपातीच्या रक्कमा परत देऊन अंतिम मुदत देणार,वेतनवाढ रोखणार नाहीत ,24 वर्षाची निवड श्रेणी विना अट देणार कोणतेही प्रशिक्षण नाही,जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या होणार त्याचा आदेश काही दिवसात निघेल,शिक्षक भरती आचार संहिता पूर्वी करणार,जुनी पेन्शन योजना यांच्या अंमलबजावणी करणार असेहीते म्हणाले.

 

       महामेळावा अलोट गर्दीत आणि मोठ्या थाटामाात संपन्न झाला.याचे कारण म्हणजे गेली 15 दिवसापासून  सर्वच कार्यकर्ते शाळा,शाळांवर जाऊन प्रत्येक शिक्षकांना मेळाव्याला येण्यासाठी आवाहन करत होते,आणि त्यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देऊन असंख्य सर्वसामान्य शिक्षक वर्ग,असंख्य महिला वर्ग सुमारे 3000 संख्येने उपस्थित होते.


शिक्षक नेते संजय कळमकर यांची राज्याच्या संपर्क प्रमुखपदी आणि रावसाहेब रोहकले गुरुजी यांची राज्याच्या उपनेतेपदी निवड जाहीर करताच सर्वांनी टाळ्या च्या गजरात स्वागत केले ,याचे कारण हे खंबीर नेतृत्व सर्वांना उपयोगी पडणार याची खात्री आहे.सन 2024 मधील जिल्हांतर्गत बदल्या या दोघांनी मनावर घेऊन आचासंहितेपूर्वी झाल्याचं पाहिजे यासाठी जोरदार प्रयत्न करावेत.असंख्य शिक्षक या मागणीसाठी मोठ्या आशेने आले होते.प्रश्न सर्वच सुटले आणि महा अधिवेशन यशस्वी झाले ,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.