Header Ads

Shrirampur: खा.गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात श्रम-संस्कार शिबीर उत्साहात संपन्न

  Shrirampur: खा.गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात श्रम-संस्कार शिबीर उत्साहात संपन्न

Shrirampur: खा.गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात श्रम-संस्कार शिबीर उत्साहात संपन्नश्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर येथील खा.गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व खा. गोविंदराव आदिक विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत हिवाळी विशेष श्रम-संस्कार शिबिर नुकतेच संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन सौ. प्रज्ञा सिनारे (प्रशासकीय अधिकारी शिर्डी संस्थान) व ॲड.स्नेहल चेतन चव्हाण- घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास शिरसगांव ग्रामपंचायत उपसरपंच संजय यादव,सुरेश मुदगुले, सचिन गवारे, ग्रामपंचायत सदस्य व ॲड.गणेश सिनारे हे प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यासाठी व्यासपीठच आहे असे ॲड.स्नेहल चव्हाण- घाडगे पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या,तर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करून यशस्वी व्हावे असे आवाहन सौ. प्रज्ञा सिनारे मॅडम यांनी  केले.

शिबिरात विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन,बालविवाहास कायद्याने बंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, ग्राम स्वच्छता, इत्यादी विषयावर जनजागृती केली.या शिबिरात डॉ.प्रशांत कदम - यांनी अवयव दान हे महान दान असल्याचे सांगितले.तर प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी महाराष्ट्र जमीन महसूल कायदे व मतदार जागृती याविषयी सखोल माहिती विषद केली.ॲड. अजित डोखे यांनी कायद्यातील नवीन बदल आणि कोर्ट कामकाज याविषयी मार्गदर्शन केले.

प्रा. विना मुंगशे यांनी शिवराज्याभिषेक दिन, प्रा.आशा कवडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना हिच समाजसेवा या विषयावर शिबिरादरम्यान व्याख्यान दिले.समारोप प्रा.विनया कांबळे यांच्या मार्गदर्शनाने झाले, शिबिराचे प्रास्ताविक प्राचार्या संघमित्रा राजभोज यांनी केले, तर आभार प्रदर्शन एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा. आशा कवडे यांनी केले. दर्शन बनकर, विशाल कांकरिया, प्रजापत भगीरथ, डोखे अजित, आकांक्षा पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

सर्व स्वयंसेवक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.मोठ्या उत्साही वातावरणात सदरील शिबीर संपन्न झाले.

संकलन

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर  

9561174111

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.