Sun Pharma School: इलेमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परिक्षेचा सन फार्मा विद्यालयाचा 100 टक्के निकाल

Darshak
0

 Sun Pharma School: इलेमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परिक्षेचा सन फार्मा विद्यालयाचा 100 टक्के निकाल

Sun Pharma School: इलेमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परिक्षेचा सन फार्मा विद्यालयाचा 100 टक्के निकाल
   Sun Pharma School:  अहमदनगर (प्रतिनिधी)  - महाराष्ट्र राज्य संचानालय, मुंबई आयोजित शासकीय इलेमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकलेच्या परिक्षा झाल्या. त्यामध्ये नागापुर येथील सन फार्मा विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. इलेमेंटरीसाठी 33  तर इंटरमिजिएट 26 विद्यार्थी परिक्षेस बसले होते, ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या दोन्ही परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला.


     इलेमेंटरी परिक्षत खुशी कुर्टे, सिद्धी जायभाय, स्तवन भोसले हे विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत तर वैष्णवी भोर, सानवी साळूंके हे ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाले. बाकी सर्व विद्यार्थ्यांनी ‘क’ श्रेणी मिळविली. तसेच इंटरमिजिएट परिक्षेत आदिती औटी, प्रणव आजबे, किरण गर्जे, शिवतेज घोडके, ज्ञानेश्वरी जाधव, चेतन काळे, रवि कुशवाह, संदेश मगर, मृदूल शिंदे, जुबेर मुलानी या विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी मिळाली तसेच क्षितीजा ढवळे, अनंत शिंदे, अंशु यादव यांना ‘ब’ श्रेणी आणि बाकी सर्व विद्यार्थी ‘क’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.


     या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक रावसाहेब सातपुते, कला शिक्षक रा.ज.धस यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर,  सचिव बबनराव कातोरे, उपाध्यक्ष शांताराम गाडे पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष सुदामराव भोर, रावसाहेब सप्रे, दिगंबर सप्रे व सर्व पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचानी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)