Header Ads

Urban Bank Colony: विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा 27 वा वर्धापन दिन अर्बन बँक कॉलनी उत्साहात साजरा

 Urban Bank Colony: विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा 27 वा वर्धापन दिन अर्बन बँक कॉलनी उत्साहात साजरा 

Urban Bank Colony: विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा 27 वा वर्धापन दिन अर्बन बँक कॉलनी उत्साहात साजरा



     अहमदनगर (प्रतिनिधी)  - विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा 27 वा वर्धापन दिन अर्बन बँक कॉलनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हौशी विठोबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस पहाटे रुद्राभिषेक, महापूजा, काकडा होऊन सायंकाळी महाआरती, महाप्रसादाने मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

     यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक निखिल वारे, अमोल गाडे, योगीराज गाडे,ज्योतीताई गाडे, भाजप शहराध्यक्षा प्रिया जानवे माजी शहर अभियंता एन.डी. कुलकर्णी, शहर अभियंता मनोज पारखे, आदिनाथ जोशी, अभिजीत जोशी, संदीप यादव, प्रवीण डोक्रस, डॉ. ओंकार कुलकर्णी, पुरषोत्तम जोशी, प्रशांत खांडेकर, प्रणव रेखी, प्रज्ञा जोशी, मानसी पारखे, स्मिता ब्रम्हे, आदिसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     संध्याकाळी शास्त्रीय गायिका संपदा चौधरी, कुसुम लोखंडे आदींनी भजनाचा कार्यक्रम सादर करून  भक्ती गीतांची मेजवानी रसिकांना दिली. शेखर दरवडे यांनी तबल्याची सुरेख साथ दिली. मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. अश्विनी राजेश अध्यापक यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

     कार्यक्रम यशस्वितेसाठी राजु कुलकर्णी, अजय घोलप, मनोहर श्रीपत, अतुल जोशी यांनी परिश्रम घेतले. शेवटी भार्गव जोशी यांनी आभार मानले.
x

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.