Header Ads

खा.डॉ.सुजय विखे यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रभाग 4 मध्ये जल्लोष

विकास कामांमुळे खा.सुजय विखे यांच्या विजयाची खात्री  - संगीताताई खरमाळे

खा.डॉ.सुजय विखे यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रभाग 4 मध्ये जल्लोष    अहमदनगर (प्रतिनिधी)  - खासदार डॉ.सुजय विखे यांना पुन्हा एकदा भाजपाची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक 4 मध्ये फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. संगीताताई खरमाळे. रामदास आंधळे, नितीन शेलार, सुजित खरमाळे, अमित गटणे,वैभव झोटींग, विनोद भिंगारे, संतोष बडवे, राजू मंगलारप, अशोक गाडे, साधना भिसे, सौ.रच्चा, प्रज्ञा कुलकर्णी, संध्या जाधव, संगिता धामणे, सौ.कुलकर्णी, बोरुडे, घावटे आदिंसह महिला उपस्थित होत्या.     याप्रसंगी संगीताताई खरमाळे म्हणाल्या, खासदार सुजयदादा विखे यांनी गेल्या पंचावार्षिकमध्ये नगर दक्षिण भागात विकास कामांचा डोंगर उभा केला. वाड्या-वस्त्यांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याचबरोबर नगर शहरातील उड्डाणपुल, वयोश्री योजना, युवकांना रोजगाराची संधी, 


शहरातील प्रत्येक भागातील विकास कामांसाठी निधी, महिलांसाठीच्या योजना तसेच शासकीय योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम खासदार सुजय विखे यांनी केले आहे. त्यामुळे यंदाही त्यांनाच तिकिट मिळणार हे नक्की होतेच. भाजप कार्यकर्त्यांनी खा.सुजय विखे यांच्या प्रचारास गेल्या महिन्याभरापासूनच सुरुवात केली आहे. यंदाही ते मोठा विजय मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला.


     याप्रसंगी रामदास आंधळे, नितीन शेलार यांनीही सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करुन खा.सुजय विखे यांना निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.