Header Ads

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालय आयोजित नेक्सजेन २०२४ प्रदर्शन उत्साहात

 Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालय आयोजित नेक्सजेन २०२४ प्रदर्शन उत्साहात

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालय आयोजित नेक्सजेन २०२४ प्रदर्शन उत्साहात
 अहमदनगर- अहमदनगर महाविद‌यालयातील बी.बी.ए. विभागातर्फे नेक्सजेन - 2024 प्रदर्शन उत्साहात पार पडले. बी.बी.ए.चे विद्यार्थी दरवर्षी हे प्रदर्शन भरवितात. यंदाचे १३ वे वर्ष होते.  प्रदर्शनाचे उद्‌घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते झाले. 

प्राचार्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांनी भरविलेल्या या प्रदर्शनाचे कौतुक केले. कारण अश्या उपक्रमातून प्रॅक्टिकल ज्ञान मिळते. उपक्रमातून वि‌द्यार्थ्यांना  पुढील आयुष्यात निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन केले.

      या कार्यक्रमाचे प्रायोज‌क "व्हिवो एक्सक्लूजीव स्टोअरचे संचालक  कमलेश झंवर होते. प्रदर्शनात विविध प्रकारचे 60 स्टॉल होते. प्रदर्शनासाठी विविध कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापकांनी भेट दिली.तसेच नगरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

       प्रदर्शनाच्या वेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. भालसिंग, डॉ. पारगे, डॉ. बेदरकर, उप-प्राचार्य नॉन-अॅण्ट सेक्सनचे डॉ. रज्जाक, महाविद्यालयाचे रजिस्टार मि. चक्रनारायण व लायब्ररीचे प्रमुख डॉ. फुगनार यांचे सहाय्य लाभले.  कार्यक्र‌माचे सूत्रसंचालन प्रा. तृप्ती कोगरी यांनी केले. प्रद‌र्शनाचा हेतू विभागप्रमुख डॉ. तुषिता अय्यर यांनी स्पष्ट केला.

      कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सपना स्वामी यांनी केले. प्रदर्शनासाठी बी.बी.ए.च्या सर्व प्राध्यापक वृंद व विदयार्थ्यांनी परिश्रम घेतले. या.प्रदर्शनासाठी मिडिया पार्टनर श्री. साई सुरम होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.