Header Ads

Ahmednagar Music: ‘सोलफुल क्लासिक्स’ला उस्फुर्त प्रतिसाद

 अपूर्वा निषाद आणि अभय जोधपूरकर यांच्या ‘सोलफुल क्लासिक्स’ला उस्फुर्त प्रतिसाद

Ahmednagar Music: ‘सोलफुल क्लासिक्स’ला उस्फुर्त प्रतिसाद

     अहमदनगर -  अहमदनगर येथील माऊली सभागृहमध्ये पार पडलेल्या ‘सोलफुल क्लासिक्स’ या अपूर्वा निषाद आणि अभय जोधपूरकर यांच्या भव्यदिव्य संगीत कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.


     कार्यक्रमाची सुरुवात अपूर्वाच्या ‘प्यार हुवा चुपकेसे’ ह्या सुमधुर गाण्याने झाली. त्यानंतर अभय जोधपूरकर यांच्या ‘जब तक जहाँ में’ या लोकप्रिय गाण्याने संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाट झाला. अपूर्वाच्या ‘अब जो मिले है तो..’ या गाण्याने कार्यक्रमाला एका उंचीवर नेले. ‘निले निले अंबर पर..’ या अभय जोधपुरकर सोबत सुप्रसिद्ध गिटार वादक हार्दिक रावल यांनी सोलो गिटार पिस सादर करुन सभागृह दणाणून सोडले. अपूर्वाने यानंतर ‘आओ ना.., ये मेरा दिल.., झुमका गिरा रे.., दम मारो दम.., प्यार करने वाले.. 


तर अभय जोधपूरकर यांनी ‘बार बार देखो..,बदन पें सितारे..., गुलाबी आंखे..., याद आ रहा है.., ओम शांती ओम.. ही बहारदार गाणी सादर करत प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले. तसेच ‘ओ हसिना जुल्फोवाली.., लेकरु हम दिवाना दिल.., आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे..’ ही युगल गीते सादर केली. तर अभय कांकरिया यांनी ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने.., ओ मेहबूबा..,’ ही गाणी गाऊन प्रेक्षकांना मुकेशची आठवण करून दिली तर ‘बाप से बेटा सवाई...’ अशी खैरियत तो पुछो.., ये जवानी है, दिवानी.. ही गाणी ओम कांकरिया जोश पूर्ण सादर केली.


     संपूर्ण कार्यक्रमाच्या संगीत नियोजन अपूर्वा निषाद च्या वडिलांनी म्हणजे संदीप भुसे यांनी केले होते तर कार्यक्रमसाठी अभूतपूर्व साउंड अहमदनगर मधील प्रसिद्ध असलेल्या राजू ढोरे यांचा होता आणि साउंड इंजिनिअर चे सुरेख काम केविन पिल्ले यांनी पाहिले.प्रकाश योजक अभिनंदन ढोरे व प्रसाद बेडेकर यांनी केले.


     रसिक चाहत्यांना अतिशय श्राव्य आणि दिमाखदार संगीत  ऐकायला देणारे  अमन सय्यद, चिंतन मोढा, अ‍ॅडविन, अजय साळवे, आसिफ खान, हार्दिक रावल, अमित बरुआ, अजित गुंदेचा, ललित भूमकर, गौतम गुजर, दिपक काळे यांनी सोलफुल क्लासिक्स हा सोलफुल केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले.


      कार्यक्रमास विशेष सहकार्य विवेक भापकर, कुंदन कांकरिया, राजेश भंडारी, धिरज कायगावकर, अमोल रोडे,किरण कोलते, निलेश चोपडा, प्रणिल मुनोत, सुधीर तावरे, चैत्राली जावळे, जावेद शेख, ज्ञानेश कुलकर्णी,  ज्ञानेश शिंदे, गौतम मुनोत, के.के.शेट्टी, विकास सांगळे, धनेश बोगावत, जितेंद्र मुनोत यांनी हातभार लावला.


     कार्यक्रम यशस्वीतेसाठी  ब्लॉसम बॉक्सच्या आयुषी लुंकड, आर्क एंटरटेनमेंटच्या ऋतुजा रविंद्र यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.