Header Ads

दिलीप सातपुते व आकाश कातोरे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्ती

 दिलीप सातपुते व आकाश कातोरे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्ती

दिलीप सातपुते व आकाश कातोरे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्ती    अहमदनगर   - अहमदनगर शहर शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नुकतीच नियुक्त करण्यात आली आहे. तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.


     दिलीप सातपुते हे सध्या शिवसेनेच शहरप्रमुख असूनमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे निकवर्तीय मानले जातातशिवसेना पक्ष वाढीसाठी ते  प्रयत्नशिल आहेतमाजी नगरसेवक राहिलेले दिलीप सातपुते यांनी अनेक विकास कामांसाठी पाठपुरावा करुन ती कामे करवून घेतली आहेकेडगांव व परिसरातील विविध विकास कामांसाठी ते नेहमीच अग्रही राहिले आहे.


     तसेच आकाश कातोरे हे सध्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असूनयुवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन केले आहेत्याचबरोबरच शहरातील विविध प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवत असतातविशेष नागापुर-बोल्हेगाव परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न करत आहेत.


     दिलीप सातपुते व आकाश कातोरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहेया निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेखा.सदाशिव लोखंडेजिल्हाप्रमुख अनिल शिंदेबाबूशेठ टायरवाले आदिंनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.