Header Ads

दर्शक अग्रलेख - इलेक्ट्रॉल बॉण्ड घोटाळा जितका वरून दिसत आहे याची व्याप्ती आणखी खोल...

दर्शक अग्रलेख - इलेक्ट्रॉल बॉण्ड घोटाळा जितका वरून दिसत आहे याची व्याप्ती आणखी खोल... 

दर्शक अग्रलेख - इलेक्ट्रॉल बॉण्ड घोटाळा जितका वरून दिसत आहे याची व्याप्ती आणखी खोल...इलेक्ट्रॉल बॉण्ड घोटाळा जितका वरून दिसत आहे याची व्याप्ती आणखी खोल आहे आणि हा घोटाळा  तितकाच मोठा आहे या घोटाळ्याची माहिती हळूहळू समोर येत असून या घोटाळ्याची माहिती जनतेसमोर खुले होतील हे मात्र नक्की झालेला घोटाळा हा इलेक्ट्रॉल बॉण्ड मुळे कधीच बाहेर येणार नाही अशा अविर्भावात भाजप पक्ष होता असे वाटते त्यांना  न्यायव्यवस्थेने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि एसबीआयला फटकारल्या नंतर कोणत्या कंपनीने किती इलेक्ट्रॉल बॉण्ड  खरेदी केले आणि कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला ही माहिती दडवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू असताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे सर्व माहिती समोर आणावी लागली एकी कडे एसबीआय ही माहिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने वेळ वाढवून देण्याचे विनंती केली होती आणि याच समर्थन निवडणूक आयोगानेही केला होता परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांच्या या वराती मागून घोडे पळविण्याचा प्रकाराला आळा लावला इलेक्ट्रॉल बॉण्ड म्हणजे वाहत्या गंगेत हात धुणे आणि आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे असा प्रकार सुरू असल्याचं या घोटाळ्यावरून दिसत आहे.


 आता कोणत्या पक्षाने या घोटाळ्याच्या गंगेत किती हात धुतले आणि कोणत्या पक्षाने किती पोळ्या भाजल्या तेही जाहीर झालेल्या संपूर्ण यादी वरून स्पष्ट होत आहे संपूर्ण इलेक्ट्रॉल बॉण्ड 16492 कोटींचे त्यापैकी 8252 कोटी रुपये भाजप पक्षाला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे म्हणजेच काय तर एकूण बॉण्डच्या रकमेपैकी जवळपास 48 टक्के रक्कम ही भाजप पक्षाला मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक देणगी मिळालेला पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष काँग्रेस त्यानंतर  बीजू जनता दलाला 775 कोटी डीएम केला 639 कोटी आम आदमी पार्टीला 66 कोटी, ए डी एम के ला 6 कोटी अशा प्रकारे खूप मोठी यादी आणि कोट्यावधी रुपये या   इलेक्ट्रॉल बॉण्ड मधून देवाणघेवाण झाल्याचे स्पष्ट झाले झाले आहे. 


आता या इलेक्ट्रॉन बॉण्ड देणगी रक्कम साठी सुरुवात झालेला रोखा याला घोटाळा म्हणण्या मागे नेमके कारण काय तर याचा एक छोटा उदाहरण आपण पाहूया देशातील मोठ मोठ्या कंपन्या या बॉण्ड खरेदी मध्ये सामील आहे या यादीत एक कंपनी आहे ती म्हणजे टोरेंट ग्रुप या ग्रुपमध्ये दोन कंपन्या सामील आहेत एक म्हणजे टोरेंट पॉवर वीज निर्मिती करते आणि दुसरी म्हणजे टोरेंट फार्मासिटि-कल जी औषध निर्मिती करते  कंपन्या आहेत तर या टोरेंट ग्रुप ने एकूण 185 कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉण्ड खरेदी केली आहे.  


भाजपला 185 कोटींचे देणगी मिळाल्याचेही स्पष्ट होते. टोरेंट ग्रुप यांचे प्रमुख सुधीर मेहता हे आहेत आणि या ग्रुपचे प्रमुख कार्यालय अर्थातच गुजरात मध्ये आहे. सुधीर मेहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी निकटचे संबंध असल्याचे समजते. फ्युचर गेमिंग ऑनलाइन लॉटरीचा  देशभर पसरलेला लॉटरीचा मोठा जाळ आहे आणि सर्वाधिक रोखे म्हणजेच इलेक्ट्रॉल बॉण्ड याच कंपनीने खरेदी केली.  


फ्युचर गेम कंपनीने  1368 कोटींचे इलेक्ट्रॉल बॉण्ड खरेदी करून देणगीची लॉटरी  वाटली. २०१९ ते २०२४ या काळात भाजपने ६०६०.५ कोटी मूल्यांचे रोखे वटवले म्हणजे त्यांचे रोखीत रुपांतर केले. रोखीत रुपांतर झालेल्या एकूण निवडणूक रोख्यांमध्ये हे प्रमाण ४७.५ टक्के इतके होते. एप्रिल २०१९ मध्ये १०५६ कोटी आणि मे २०१९ मध्ये ७१४ कोटी रुपयांचे रोखे भाजपने वटवले. म्हणजे या दोन महिन्यांमध्येच जवळपास एक तृतियांश मूल्यांचे रोखे या पक्षाने वटवले. 


तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनुक्रमे ३५९ कोटी आणि ७०२ कोटी मूल्याचे रोखे वटवले गेले. नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. तृणमूल काँग्रेस पक्ष हा भाजप नंतरचा निवडणूक रोख्यांचा दुसरा सर्वांत मोठा लाभार्थी ठरला. 


राष्ट्रीय म्हणवणाऱ्या काँग्रेस पक्षापेक्षा या पक्षाने अधिक मूल्याचे निवडणूक रोखे वटवले. ही रक्कम १६०९ कोटी रुपये इतकी भरते. २०२१ मधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या पक्षाने मोठे यश मिळवले. बहुतेक निवडणूक रोखे हे या निकालानंतर वटवलेले आढळतात. 


भाजप प्रमाणे राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष निवडणूक रोख्यांचा तिसरा मोठा लाभार्थी ठरला. या पक्षाने  १४२१.८७ कोटी मूल्याचे ३१४६ रोखे वटवले.लोकसभा निवडणूक २०१९ पूर्वी जितक्या मूल्याचे (११८.५६ कोटी) निवडणूक रोखे वटवले, त्यापेक्षा तिप्पट मूल्याचे (४०१.९१ कोटी) या पक्षाने ऑक्टोबर २०२३ म्हणजे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकां पूर्वी रोखीत काढले. 


या निवडणुकीपूर्वी राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये हा पक्ष सत्तेत होता. दोन्ही राज्यांत काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. तर तेलंगणात काँग्रेस सत्तेवर आला. यंदाच्या जानेवारी महिन्यात या पक्षाने ३५.९ कोटी मूल्याचे रोखे वटवले. भाजपच्या तुलनेत (२०२ कोटी) हे प्रमाण खूपच कमी होते.भाजप, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसनंतर दक्षिणेकडील पक्षांना रोख्यांचा लाभ सर्वाधिक झालेला दिसून येतो. 


भारत राष्ट्र समिती (१२१४.७० कोटी), बिजू जनता दल (७७५.५० कोटी), द्रविड मुन्नेत्र कळघम (६३९ कोटी), वायएसआर काँग्रेस (३३७ कोटी), तेलुगु देसम पक्ष (२१८ कोटी) अशी क्रमवारी लागते.महाराष्ट्रातील शिवसेनेचा क्रमांक (१५९.४० कोटी) यानंतर येतो. उर्वरित लाभार्थींना १०० कोटींपेक्षा कमी लाभ झाला. यात राष्ट्रीय जनता दल (७२.५० कोटी), आम आदमी पक्ष (६५.५० कोटी), धर्मनिरपेक्ष जनता दल (४३.५० कोटी), सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (३६.५० कोटी) अशी क्रमवारी आहे. 


महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसला ३०.५० कोटींचा लाभ झाला.


लॉटरी किंगबद्दल बोलायचे तर याच्यावर मनी लाँड्रींगचेही आरोप आहेत लॉटरी संबंधित असणार्‍या कंपनीने सर्वात मोठी देणगी इलेक्ट्रॉल बॉण्ड द्वारे दिली. त्याने खरेदी केलेल्या बॉण्डचा सर्वाधिक फायदा म्हणजेच ही देणगी सर्वाधिक मिळाली हे मात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीवरुन स्पष्ट झालेले आहेच आणि लवकरच या लॉटरी व्यवसायिकाने कोणत्या पक्षाला लॉटरी लावली तेही कळेल तोपर्यंत आपण हा घोटाळा कसा सुरु झाला आणि घोटाळ्याचा सर्वात जास्त फायदा कोणाला झाला इथपर्यंतची गोष्ट आता सर्वांना समजली असेलच


 काहि कंपन्यांवर ईडी,सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या धाडी झाल्यानंतर किती कोटींचे इलेक्ट्रॉल बॉण्ड खरेदी झाले आणि काही कंपन्यांच्या बाबतीत कोट्यवधींच्या रोखे खरेदी नंतर देशभर कोटयवधींची सरकारी कामे देऊन कंपन्यांचाही फायदा करण्यात आल्याची माहिती अगदी सावकाशपणे हळुहळु परंतु बाहेर येत आहे हे मात्र नक्की.


इलेक्ट्रॉल बॉण्ड याबाबत भाजप पक्षाला घेरण्याचे काम काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आणि काँग्रेसला  जरी तिसर्‍या क्रमांकावर या रोख्यांचा फायदा झाला तरी काँग्रेसचे म्हणणे आहे की देशातील विविध सरकारी संस्थानची भीती दाखवून आम्हाला ही देणगी मिळालेली नाही ती देणगी भाजपाने अशा प्रकारे भीती दाखवून रोखे प्राप्त केल्याचे म्हटले आहे आता यात किती तथ्य आहे तेही लवकरच स्पष्ट होईल.


तोपर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीने एवढे तर जाहीर झाले की भाजपला क्रमांक एकची देणगी इलेक्टॉल बॉण्डद्वारे मिळाली आणि दुसर्‍या क्रमांकावर अगदी खेला होबे म्हणत खेला करबो झालेला  दिसत आहे आणि तृणमुल काँग्रेस रोख्यांच्या बाबतीत काँग्रेसलाही मागे टाकले आहे हे हि आजचे तथ्य आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.