Header Ads

प्रलंबित कामे मार्गी लागल्याने नागरिकांची मोठी सोय -दत्ता सप्रे

 बोल्हेगाव परिसरातील सुमारे 26 लाखांच्या विविध कामांचा शुभारंभ

प्रलंबित कामे मार्गी लागल्याने नागरिकांची मोठी सोय  -दत्ता सप्रे
     अहमदनगर (प्रतिनिधी)  -  बोल्हेगाव परिसरातील अनेक कामे प्रलंबित होती, त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे  पाटील यांनी या भागातील कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आणि त्या कामांचा शुभारंभ होत आहे, याचे मोठे समाधान आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर राहून ते सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. प्रलंबित कामे मार्गी लागत असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे.  त्यामुळे बोल्हेगावची जनता ही कायम विखे परिवाराच्या पाठीमागे राहील असे प्रतिपादन नगरसेवक दत्ता सप्रे यांनी केले.


     पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने व खासदार सुजय विखे पाटील यांच्या निधीतून  विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. याप्रसंगी नगरसेवक दत्ता सप्रे, शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे, शुभम काकडे, ज्ञानदेव कापडे, राजेंद्र गायकवाड, रज्जाक सय्यद, विजय लोकरे, सुभाष धामणे, बाळासाहेब तापकीर, लता राऊत, सीमा गायकवाड, मनीषा पवार, संगीता वरपे, निर्मला काकडे, स्वरूपा वैजापूरकर, सविता पुंडे, हुमा शेख, लता भगत व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


     यावेळी आकाश कातोरे यांनीही  खासदार सुजय विखे यांचे व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागातील विकास कामांना निधी उपलब्ध करून दिल्याने अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न सुटत असल्याचे मोठे समाधान आहे. नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगितले.


     बोल्हेगाव येथील रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार पाईपलाईन साठी साडे पंचवीस लाख रुपयांचा खासदार सुजय विखे यांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्या अंतर्गत बोल्हेगाव प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी डीपी ते लोकरे घर रस्ता काँक्रिटीकरण, गव्हाणे घर ते ग्रीन घर रस्ता काँक्रिटीकरण, गणेश चौक ते गणेश पार्क, काकासाहेब म्हस्के कंपाउंड ते दळवी घर 600 एम एम बंदिस्त गटार आदि कामाचा शुभारंभ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. कामांचा शुभारंभ झाल्याने नागरिकांनी पालकमंती ना.राधाकृष्ण विखे व खा.सुजय विखे पाटील तसेच नगरसेवक दत्ता सप्रे व आकाश कातोरे यांचेही आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.