Header Ads

Book Publication: भक्तिरस पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

 Book Publication: भक्तिरस पुस्तकाचे प्रकाशन संपन्न 

Book Publication: भक्तिरस पुस्तकाचे प्रकाशन संपन्न               Book Publication: अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील भागवत महाराज दळवी लिखीत भक्तिरस पुस्तकाचे प्रकाशन संपन्न सिद्धीबाग येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात संपन्न झाले,यावेळी  युवा नेते धनंजय जाधव,दै समाचारचे संपादक ज्ञानेश कुलकर्णी,नीळकंठ महाराज देशमुख,राजुमामा जाधवदिलीप पांढरे,मिलींद रोहोकले,प्रितम मुथा,निखिल शेटियाराहुल पांढरे,नंदेश शिंदे,पुरुषोत्तम दळवी आदींसह दळवी कुटूंबीय व मोठया संख्नेने भाविक उपस्थित होते.

 

            यावेळी बोलताना धनंजय जाधव म्हणाले आजची पिढी ही इंटरनेटला देव मानणारी तयार होत आहे असे सांगून त्यांनी एक गोष्ट सांगितली एकदा एक जण मंदिरामध्ये दर्शनामध्ये जात असताना  त्यांना मुलगा भेटला,त्यांनी विचारलं की तुम्ही कशासाठी मंदिरात जाता त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले मी माझ्या ज्या काही इच्छा असतात त्या सांगायला व पूर्ण करायला देवाकडे जातो,यावर मुलगा म्हणाला त्यासाठी तुम्ही गुगलवर जाइंटरनेटवर तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल अशी ही आजची पिढी इंटरनेटलाच देव मानू लागली आहे त्यांच्यासाठी भक्तीरस सारखे पुस्तक चांगले मार्गदर्शन ठरणार आहे.


           माझे संपूर्ण कुटुंब अध्यात्मात आहे, 1992 साली शीला पूजन या महादेव मंदिरात माझे वडील कृष्णाभाऊ जाधव यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळेस दळवी महाराज ही होतेगेली पन्नास वर्षे ते या मंदिरात न चुकतारोज सेवा करत असून  संध्याकाळी कीर्तन करतात,जर अध्यात्मिक क्षेत्रातला मनुष्य राजकारणात आला तर काय होते हे आपण राम मंदिरावरून पाहू शकतो असेही ते म्हणाले.

 

          श्री कुलकर्णी म्हणाले कीर्तनाने व अध्यात्माने काय घडते याचा मी स्वतःसाक्षीदार आहे,लहानपणापासून मी कधी अध्यात्माकडे वळलो  नाही,गणपतीत व नवरात्रात एकदा देवाचे दर्शन घ्यायचे एवढेच मला माहिती होते पण दोन वर्षांपूर्वी आई,वडील,चुलते वारले व नंतर ज्यष्ठ बंधू वारले व सर्व ओझे माझ्या अंगावर आले,मी दबून जातो की काय असे वाटत होते.


खूप टेन्शन येत होते काय करावे हे सुचत नव्हते,पण एक दिवशी रात्री सहज किर्तन लावले त्या दहा मिनिटाच्या कीर्तनाने माझे सर्व नकारात्मक विचार निघून गेले व पुढे जाऊन मी रोज कीर्तने ऐकू लागलो त्यातून मला सकारात्मकता मिळाली व मी आज एक  संपादक म्हणून व घरची सर्व जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पडत आहे हे सर्व अध्यात्मानमुळे घडले आहे.


          दळवी महाराज यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले पुस्तक लिहण्यामागची संकल्पना सांगितली व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. एक वर्षात हे दुसरे पुस्तक होईल असे वाटले नव्हते असे सांगून ते म्हणाले हि सर्व या महादेवाची कृपा आहे यावेळी नीळकंठ महाराज देशमुख यांनी पुस्तकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.