Header Ads

Dr Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील आव्हानात्मक बदल स्विकारुन स्वत:मध्येही ऋतुप्रमाणे बदल केलाच पाहिजे-डॉ.अभिजित पाठक


Dr Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न    अहमदनगर (प्रतिनिधी) - आज आपण तंत्रज्ञानाचे विकसित रुप पाहतो, पण यासाठी शास्त्रज्ञांना खूप संशोधन करावे लागले. ज्याला आजार आहेत, त्याला पथ्य हे असणारच. जो निरोगी आहे, त्याला देखील औषधांविषयी आस्था असते. डॉक्टर व फार्मासिस्ट यांचे नाते जिव्हाळ्याचे असते. 


कोरानामुळे फार्मसीला अजून महत्व प्राप्त झाले, त्यामुळे विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील आव्हानात्मक बदल स्विकारुन स्वत:मध्ये ऋतुप्रमाणे बदल केलाच पाहिजे. हा बदल होत असतांना अपयश पचवावे लागेल, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ञ डॉ.अभिजित पाठक यांनी केले.


     वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे फार्मसी कॉलेजचे स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण फार्मा-रिदम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.अभिजित पाठक, डॉ.रेणुका पाठक, दंततज्ञ डॉ.अभिजित मिसाळ, अ‍ॅड.लक्ष्मीकांत पठारे, सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे 


आर.डी.बुचकुल, आर.ए.देशमुख, प्रा.दादासाहेब भोईटे, बी.बी.सिद्दम, रघुनाथ कारमपुरी, साई पाउलबुधे, श्रद्धा पाउलबुधे, संजय पवार, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, प्राचार्य डॉ.निलेश जाधव, प्राचार्या अनुराधा चव्हाण,  शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापिका, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.     यावेळी डॉ.अभिजित मिसाळ यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले, स्नेहसंमेलनातील जल्लोष हा आयुष्यभर टिकविताआला पाहिजे. आयुष्य हे मॅरेथॉन आहे, सुरुवात संथ झाली असली तरी मॅरेथॉन पुर्ण करण्याचे ध्येय ठेवावे. स्वत:शी स्पर्धा करा, ती निकोप होती. स्पर्धेत टिकण्यासाठी शारीरिक, मानसिक स्वास्थ सांभाळा, असे ते म्हणाले.     डॉ.रेखाराणी खुराणा, डॉ.रेणुका पाठक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शिक्षणामुळे बदल होतो, पण शिक्षणाची संकल्पना मात्र बदलेली नाही. स्वत:च्या कल्याणबरोबरच दुसर्‍यांचे कल्याण करा. शिक्षकांचा आदर करा.     यावेळी संजय पवार म्हणाले, सर्वप्रमुख अतिथीनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करुन जो संदेश दिला त्याचे अनुकरण करा. प्रास्तविकात बी फार्मसीचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव व डी फॉर्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण यांनी अहवाल वाचन केले. वर्षभर कॉलेजने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेने शैक्षणिक सोयी-सुविधा पुरविल्याने कॉलेजची प्रगती झाली. कुठलीही जाहिरात न करता अ‍ॅडमिशन झाले ही कामाची पावती आहे, असे सांगितले.     बी.फार्मसी, डी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी वर्षभर विविध स्पर्धा-परिक्षांमध्ये मिळविलेले यश, क्रीडा स्पर्धात केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध नाटिका, गाणी, नृत्य सादर करुन कला-गुणांचे सादरीकरण केले.


     कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.वेणु कोला, डॉ.प्रसाद घुगरकर, प्रणाली अनमल, सुधीर गर्जे, पल्लवी कदम, दुर्गेश पवळे, आबीद पठाण, मिलिंद क्षीरसागर, स्वाती कडनोर, संकेत गुंटूक आदिंसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन  डॉ.शाम पंगा यांनी केले तर आभार डॉ.रोशनी सूर्यवंशी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.