Header Ads

Dr Vikhe Patil College: टीमवर्कने कुशलतेने समस्या सोडविल्या तर विविध गुणांचा विकास होतो - इंजि.दिलीप आढाव

 डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

Dr Vikhe Patil College: टीमवर्कने कुशलतेने समस्या सोडविल्या तर विविध  गुणांचा विकास होतो - इंजि.दिलीप आढाव     अहमदनगर  -  विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी नियोजन करुन त्या दिशेने कृतिशील राहिल्यास यश मिळू शकते. नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना जिद्द आणि चिकाटी महत्वाची आहे. ‘मी’ पणा न धरता आपण टीमवर्क मध्ये कुशलतेने समस्या सोडविल्या तर विद्यार्थ्यांमधील विविध गुणांचा विकास होतो.  


सध्या विविध जटील समस्या सोडविण्यासाठी फुगल इनोव्हेशन हे नवीन क्षेत्र विकसित होत आहे. यामध्ये संशोधनासाठी भरपूर वाव मिळत आहे. यामध्ये भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी शिस्तबध्द पध्दतीने ध्येय निश्चीत करुन ते गाठण्यासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. विविध लक्ष्य ठरविल्यानंतर प्रत्येक लक्ष्यपूर्तीवर कटाक्षाने लक्ष्य दिल्यास ध्येयप्राप्ती होवू शकते असे प्रतिपादन इंजि.दिलीप आढाव यांनी केले.


     विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक पारीतोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्नाइडर कंपनीचे सिनी.जन.मॅनेजर इंजि.दिलीप आढाव, माजी विद्यार्थी  पुणे येथील टी आय.ए.ए.चे सिनीअर डायरेक्टर  इंजि.अजित पिंगळे  हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त वसंतराव कापरे,  प्रभारी सेक्रेटरी जनरल डॉ. पी. एम गायकवाड, डेप्युटी डायरेक्टर टेक्निकल सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ. उदय पी. नाईक आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी इंजि.अजित पिंगळे यांनी  महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगतांना डॉ. विखे पाटील महाविद्यालयामुळे आपल्याला जीवनात प्रगती करण्यासाठी उत्कृष्ट मार्ग मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयीन शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि व्यवस्थापनाच्या मदतीमुळे आपण यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करुन यश संपादन करावे. शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन हे जीवनातील प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडते, हे लक्षा घ्या, असे सांगितले.


      प्राचार्य डॉ. उदय नाईक यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करुन,  महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देतेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्व विकास, तांत्रिक कौशल्य विकास व संभाषणकौशल्य तसेच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती व विविध कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला.


     संस्थेचे विश्वस्त मा. वसंतराव कापरे यांनी  यशस्वी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विभागांतील प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी, विविध खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोचर महाविद्यालयातील पी एच डी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.


     यावेळी डॉ. रविंद्र नवथर,डॉ. दीपक विधाते,  तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन कोऑर्डनिटर प्रा. सुनिल मांढरे, इलेक्ट्रीकल विभाग व डॉ. निळकंठ देशपांडे, ई अ‍ॅण्ड टी सी विभाग तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


     या कार्यक्रमासाठी डॉ. विखे पा. फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ. सुजय विखे पाटील तसेच प्रभारी सेक्रेटरी जनरल डॉ. पी. एम. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.