Header Ads

Dr Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत मॉडेलिंग अ‍ॅण्ड मॅन्यूफॅक्चरिंग विषयावर कार्यशाळा

 डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत तीन दिवस बेसिक्स मॉडेलिंग अ‍ॅण्ड मॅन्यूफॅक्चरिंग विषयावर कार्यशाळा


Dr Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत मॉडेलिंग अ‍ॅण्ड मॅन्यूफॅक्चरिंग विषयावर कार्यशाळा


 अहमदनगर (प्रतिनिधी) - विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात यंत्र अभियांत्रिकी विभाग व इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 3 ते 5 एप्रिल 2024 दरम्यान तीन दिवसीय ‘बेसिक्स मॉडेलिंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, विभागप्रमुख डॉ.रविंद्र नवथर यांनी दिली.     स्वयंप्रयोजित अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ही यंत्र अभियांत्रिकीतील अद्यावत अशी टेक्नॉलॉजी आहे. या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत प्रा.प्रशांत नरवडे, प्रा.डॉ. कानिफ मरकड यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यशाळेत इंजि.एम.एम.अणेकर, संस्थेचे सेक्रेटरी डॉ.पी.एम. गायकवाड, उपसंचालक सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक आदि मार्गदर्शन करणार आहेत.      या कार्यशाळेत आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग या शाखेत शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक, रिसर्च करणारे विद्यार्थी तसेच इंडस्ट्रीमध्ये काम करणारे उमेदवार सहभागी होऊ शकतात. तरी जास्तीत जास्त प्राध्यापक, विद्यार्थी यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.रविंद्र नवथर यांनी केले आहे.     संस्थेचे चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्य.अधिकारी डॉ.खा.सुजय विखे पा. यांनी या कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.