Header Ads

Jamkhed News: बुडनशहावली दर्गा समतेचे प्रतिक -नंदकुमार गायकवाड

 सय्यद बुडनशहावली यांचा संदल उत्साहात संपन्न

Jamkhed News: बुडनशहावली दर्गा समतेचे प्रतिक -नंदकुमार गायकवाड    अहमदनगर (प्रतिनिधी)   -  मानवता धर्माची शिकवण देणारे अवलिया संत म्हणजे, सय्यद बुडनशहावली होय. पिंपरखेड (ता.जामखेड) येथे सय्यद बुडनशाहवली यांचा संदल नुकताच पार पडला. माघ पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशीपासून या संदलला सुरुवात होते. सर्व जातीधर्माचे लोक या ठिकाणी फुलांच्या चादरी, मलिदा वगैरे घेऊन येतात व मनोभावे पुजा-अर्चा करतात, अशी माहिती नंदकुमार गायकवाड यांनी दिली.


     सय्यद बुडनशहावली यांचा इतिहास आजही पुर्णपणे जनतेसमोर आलेला नाही. सुमारे 100 वर्षापासून या कार्यक्रमाची परंपरा असल्याचे श्री.गायकवाड यांनी सांगितले. तसेच या ठिकाणचा जिर्णोद्धार व्हावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


     गायकवाड परिवाराकडून मागील 9 वर्षांपासून दोन दिवस सकाळी सरबत व रात्री चहाचे वाटप केले जाते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकुमार गायकवाड आणि मित्र परिवाराने परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.