Header Ads

Kirtan: साधू संत साधारण उपदेश करतात-हरिभाऊ महाराज भोंदे

 Kirtan: साधू संत साधारण उपदेश करतात-हरिभाऊ महाराज भोंदे 

Kirtan: साधू संत साधारण उपदेश करतात-हरिभाऊ महाराज भोंदे


            अहमदनगर (प्रतिनिधी) - उपदेश हे दोन प्रकारचे असतात एक साधारण व दुसरा असाधारण यामधील साधारण उपदेश संत करत असतात असे प्रतिपादन  हरिभाऊ महाराज भोंदे यांनी  केले.

 

बुरुडगाव रोडवरील फुलसौंदर मळातील शिवपंचायतन मंदिराच्या प्रांगणात  वैष्णव मित्र मंडळ आयोजित  महाशिवरात्र(पूर्वकाळ)महोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या  कीर्तन सेवेत दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

 

          ते पुढे म्हणाले सकल जीवा करता केलेला उपदेश म्हणजे साधारण उपदेश  होयजीवाची साधारणतः अपेक्षा असते की सुख मिळो.प्रत्येकालाच देव पाहिजे असे नाही पण सुख नाकारणारा या जगात एकही पशु पक्षी मनुष्य प्राणी नाही,तर दुःख हवा असणारा कुणीही नाही. 


असाधारण उपदेश  म्हणजे विशिष्ट आचारसंहिता साधकाला घालून दिलेला उपदेश होय,सुख  मिळेल ही खात्री आहे तिथे सर्वार्थाने जीव धावत जातो प्रपंच असो वा परमार्थ ,परम सुखाची प्राप्ती मनुष्याला हवी असते.


           पंचवीस वर्षात या ठिकाणी अनेक महात्म्यांची  प्रवचन येथे झाली  आहे,प्रपंचाकरता जसा अधिकारी लागतो तसा परमार्थ करीत सुद्धा अधिकारी लागतो,अनाधिकाऱ्याकडून होणारा कधीही साध्य प्राप्त करू शकत नाही. प्रत्येकाने स्वतःमधील दोष अवगुण सांगावे म्हणजे ते नष्ट होतात असेही ते म्हणाले.

 

        आजची संत सेवा मेजर गोवर्धन कामिनासे यांच्याकडून होती कीर्तनास मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्तिथ होते  प्रथम महापौर भगवान फुलसौंदर,विष्णू फुलसौंदर यांच्यासह दिलीप माडगे,राजू फुलसौंदरभास्कर गायकवाडअलिन साळूंकेनाना इंगवले


सुनिल राऊतदिपक फुलसौंदर,गणेश फुलसौंदर,सुनिल फुलसौंदर,अवधुत फुलसौंदर सह महाशिवरात्र उत्सव समिती व वैष्णव मित्र मंडळचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रम यश्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.