Header Ads

Maharashtra BJP: नागपूरहुन नितीन गडकरी,अहमदनगरहुन डॉ सुजय विखे आणि बीडहून पंकजा मुंडे अशी आहे २० उमेदवारांची यादी

Maharashtra BJP: नागपूरहुन नितीन गडकरी,अहमदनगरहुन डॉ सुजय विखे आणि बीडहून पंकजा मुंडे अशी आहे २० उमेदवारांची यादी  

Maharashtra BJP: नागपूरहुन नितीन गडकरी,अहमदनगरहुन डॉ सुजय विखे आणि बीडहून पंकजा मुंडे अशी आहे २० उमेदवारांची यादीअहमदनगरला गेल्या अनेक दिवसापासून लोकसभा जागेवरून अनेक तर्क वितर्क सुरु होते आणि डॉ  सुजय विखेंना त्यांच्याच पक्षाचे आमदार राम शिंदे हे तिकिटासाठी इच्छुक होते त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केलेली होती असो भाजपने पुन्हा एकदा डॉ सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास टाकत त्यांना पुन्हा अहमदनगर दक्षिण जागेसाठी संधी देऊ केली याबरोबरच भाजप च्या पहिल्या यादीत नाव न आल्याने महाराष्ट्रातचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या नावावरूनही राजकारण चांगलेच तापले होते परंतु भाजपने त्यांच्या नावावरही शिक्का मोर्तब केले त्यानंतर सर्वाधिक चर्चा होती ती पंकजा मुंडे यांच्या नावाची कारण मागील काही काळापासून त्या भाजपच्या केंद्र शासनाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होत्या परंतु मुख्य प्रवाहातील राजकारणापासून अलिप्त होत्या आणि त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी आग्रही होते आणि तसेच आता झालेले दिसते भाजपने त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांच्या जागेवर बीडमधून त्यांना तिकीट देऊ केला. 


भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे, रक्षा खडसे, सुजय विखे पाटील यांच्यासह.महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवरांची यादी जाहीर झाली आहे. 

भाजप आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. 

100 उमेदवारांच्या नावांची घोषणा आज होणार आहे. यात महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांचीही घोषणा होऊ शकते. नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, संजयकाका पाटील या विद्यमान खासदारांसह राज्यातून मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात होती. अपेक्षेप्रमाणे यांची नावे या यादीत आली आहेत. यासोबतच उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, कर्नाटकातील उमेदवारांची नावं आज जाहीर होणार आहेत...त्यामुळे महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. 


महाराष्ट्र भाजपची यादी जाहिर

 • नागपूर - नितीन गडकरी

 • अहमदनगर - सुजय विखे पाटील

 • पुणे - मुरलीधर मोहळ

 • बीड - पंकजा मुंडे

 • माढा - रणजित नाईक निंबाळकर

 • जालना - रावसाहेब दानवे

 • दिंडोरी - भारती पवार

 • रावेर - रक्षा खडसे

 • नंदुरबार - हिना गावित

 • धुळे - सुभाष भामरे

 • जळगाव - स्मिता वाघ

 • अकोला - अनुप धोत्रे

 • वर्धा - रामदास तडस

 • चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार

 • नांदेड - प्रतापराव चिखलीकर

 • भिवंडी - कपिल पाटील

 • मुंबई उत्तर - पियुष गोयल

 • मुंबई उत्तर पूर्व - मिहिर कोटेचा

 • लातूर - सुधाकर सुंगारे

 • सांगली - संजय काका पाटील


भाजपच्या पहिल्या यादीत पत्ता कट झालेले खासदार

बीड - प्रितम मुंडे

जळगाव - उन्मेश पाटील

उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी

उत्तर पुर्व - मनोज कोटेक

चंद्रपूर - हंसराज अहिरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.