Header Ads

NCP Womens Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला आघाडीची कार्यकारणी जाहीर

 NCP Womens Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

NCP Womens Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस  शहर महिला आघाडीची कार्यकारणी जाहीर        अहमदनगर  -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील कर्तुत्वान महिलांचा गौरव करून महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची शहराची कार्यकारणी शहराध्यक्ष नलिनी गायकवाड यांनी जाहीर केली.यावेळी  शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर,विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई तांबोळी,मा. नगरसेवक सुदाम भोसले,शहर उपाध्यक्ष  भांबरकर,व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अनंतराव गारदे आदीसह शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


            यावेळी  नलिनी गायकवाड म्हणाल्या की महिलांनी चूल,मुल,याव्यतिरिक्त महिलांनी राजकारणात सक्रिय सभासद होऊन सक्रियपणे पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचा हात बळकट करण्यासाठी शहराची सर्वसमावेशक कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली आहे.या पुढील काळात पक्षाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार आहे.


             अभिषेक कळमकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या  शहराध्यक्ष नलिनी गायकवाड यांच्या माध्यमातून या पुढील काळात महिलांसाठी शासकीय योजना,रोजगार,बचतगट आदीसह महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम,कार्यशाळा,राबवण्यात येणार आहेत.तसेच येणाऱ्या काळात महिलांच्या प्रश्नांसाठी महिलांना एकत्रित करून चांगल्या प्रकारचे ध्येय धोरण आखून खा सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनात काम करण्यात येणार आहे.शरद पवार यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरण यासाठी राज्यात जे चांगले निर्णय घेतल्यामुळे महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.सध्याचे सरकार महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन करण्यात येणार आहे.


               शौकत तांबोळी म्हणाले  सध्याच्या सरकारच्या ज्या उणीव आहेत त्याबद्दल एका महिलेपेक्षा जास्त कोणी बोलू शकत नाही यापुढील काळात  महिला आघाडीच्या वतीने सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात महागाई बेरोजगारी गुन्हेगारीकरण या विरोधात पक्षाच्यावतीने जनआंदोलन उभे करण्यात येणार आहे.


         यावेळी शहरातील महिला आघाडीची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये शहर उपाध्यक्षपदी आशाताई ससाने.,सचिव-रजनीताई ताठेसारिका साळवे,मिराबाई उमाप,सहसचिव-जयश्री भिंगारदिवे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष-नीता बर्वे,सरचिटणीस-रजनी भोसलेलीना रोकडेस्वाती साळवे,युवती समन्वयक-गायत्री शिंदे,भाग्यश्री भिंगारदिवे. आदींसह ३९ महिलांच्या कार्यकारिणीला नियुक्तीपत्र देण्यात आले 


          याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, भीमराज कराळे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.