Header Ads

Pune Crime: दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी अडवले सोन्याची चैन हिसकावून नेली

Pune Crime:  दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी आडवले सोन्याची चैन हिसकावून नेली 

Pune Crime:  दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी आडवले सोन्याची चैन हिसकावून नेलीदुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी आडवले. दारु पिऊन गाडी चालवतो का तुझ्यामुळे आमचा अपघात झाला असता, असे म्हणत तरुणाच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने (Chain Snatching) हिसकावून नेली. हा प्रकार सोमवारी (दि.18) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनारायण  चौकातील पुलावर घडली. याबाबत शुभम अरुण रोकडे (वय-24 रा. डॉल्फिन चौक, बनकर शाळेजवळ, 

अप्पर बिबवेवाडी) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. 

यावरुन दोन दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांविरुद्ध आयपीसी 392, 34 नुसार 

गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरुन लक्ष्मीनारायण चौकातील ब्रिजवरून जात होते. शुभम रोकडे ब्रिजच्या मधोमध आला असता पाठीमागून दोन दुचाकीवरुन चारजण आले.


दुचाकीवरील चौघांनी शुभम याची गाडी आडवली. तु दारु पिऊन गाडी चालवतो का अशी विचारणा करुन तुझ्यामुळे

आमचा अपघात झाला असता असा आरोप केला. तर दुचाकीवरील एकाने शुभमला जवळ ओढून त्याच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपींनी यु-टर्न घेऊन पुलावरुन विरुद्ध बाजूने कात्रजच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येवले  करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.