Header Ads

Shirdi News: विश्वस्तांना याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा सत्ताधारी आमदारांवर आरोप

Shirdi News: विश्वस्तांना याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा सत्ताधारी आमदारांवर आरोप  

Shirdi News: विश्वस्तांना याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा सत्ताधारी आमदारांवर आरोपशिर्डी | 9 March 2024 : कोपरगावचे अजित पवार गटाचे आमदार तसेच शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष आशुतोष काळे हे वादात अडकले. त्यांनी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांना सुप्रिम कोर्टातील याचिका मागे घ्यावी यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जर याचिका मागे घेतली नाही तर इडी मागे लावू , संपवून टाकू अशी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केला आहे. मात्र केवळ मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने आपल्यावर खोटे आरोप करत असल्याचा पलटवार काळे यांनी केला आहे.

काळे यांच्यासह विश्वस्तांनी सुप्रिम कोर्टात तीन याचिका दाखल करत आव्हान दिले

महाविकास आघाडी सरकारने  2021 साली साईमंदिर विश्वस्त आणि अध्यक्षांची निवड केली होती. मात्र या निवडीस हायकोर्टाने स्थगिती दिल्याने तत्कालिन अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह विश्वस्तांनी सुप्रिम कोर्टात तीन याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. 


या प्रकरणाचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता असताना आता अजित पवारांसोबत सत्तेत सामील झाल्याने काळे यांनीच याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप माजी विश्वस्त सुहास आहेर यांनी केला आहे.


याचिका मागे घेण्यासाठी दबाव टाकत धमकी दिल्याचा आरोप 


माजी अध्यक्ष आशुतोष काळे यांनी विश्वस्त सुहास आहेर , सचिन गुजर, अविनाश दंडवते यांना फोन केला. याचिका मागे घेण्यासाठी दबाव टाकत धमकी दिल्याचा आरोप विश्वस्तांनी केला आहे. जर याचिका मागे घेतली नाही तर तुमच्या माघे ईडी लावली जाईल,तुमचे राजकीय भवितव्य धोक्यात आणले जाईल , तुमच्या मागे हात धुऊन लागू अशी धमकी दिल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे.


काळे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले

साईमंदिराचे माजी अध्यक्ष आशुतोष काळे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. आपण सत्ताधारी पक्षाचा आमदार झाल्याने बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून विश्वस्त मंडळ नाही. 


सरकारला याप्रकरणी मंडळ नेमता यावे यासाठी आपण याचिका मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या आरोपांवरुन एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.