Header Ads

Wadia Park Ahmednagar: कबड्डीत महाराष्ट्राची दिल्लीवर मात

  Wadia Park Ahmednagar: कबड्डीत महाराष्ट्राची दिल्लीवर मात

Wadia Park Ahmednagar: कबड्डीत महाराष्ट्राची दिल्लीवर मात          अहमदनगर (प्रतिनिधी) - वाडिया पार्क मैदानावर सुरू असलेल्या ७० व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या  दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार ४३-३० असा मोडून काढत बाद फेरी गाठली. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली. 

सुरवातीला गुण घेत दिल्लीने आपला इरादा स्पष्ट केला. पण महाराष्ट्राने त्याला प्रतिउत्तर देत १४व्या मिनिटाला पहिला लोण देत १४-०९ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात २३-१२ अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती.       
 
           दुसऱ्या सत्रात पहिल्याच चढाईत दिल्लीच्या खेळाडूची पकड करीत आपली आघाडी २६-१३ अशी वाढविली. यानंतर दिल्ली ने आपला आक्रमण आणखी धारदार करीत महाराष्ट्रावर पहिला लोण देत ही आघाडी २४-२८अशी कमी केली. 

शेवटी शेवटी दिल्लीने आणखी काही गुण घेत ही आघाडी २गुणावर आणली. त्यावेळी महाराष्ट्राचे ३ खेळाडू मैदानात शिल्लक होते. अशावेळी आदित्य शिंदेने अव्वल पकड करीत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढविल्या. शेवटी सौरभ राऊत ने दिल्लीचे शिलकी ३ गडी टिपत दिल्लीवर लोण दिला आणि पंचानी सामना संपल्याची शिट्टी वाजविली.


अहमदनगर- माजी मंत्री आमदार राम शिंदे, राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा . शशिकांत गाडे वाडिया पार्क मैदानावरील  ७० व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे सामने पाहताना तल्लीन झाले होते तर  मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता सर्व प्रेक्षक गॅलरी फुल होते (फोटो- महेश कांबळे अहमदनगर)

      माजी मंत्री आमदार राम शिंदे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर सह अनेक मान्यवर तसेच मुख्य आयोजक तथा राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा . शशिकांत गाडे, नगरसेवक योगीराज गाडे,राज्य क्रिडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे , जयंत वाघ आदींसह मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता सर्व प्रेक्षक गॅलरी फुल होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.