Header Ads

Ashoka Art: वारली चित्रातून साकारलाय संपूर्ण राम जन्मापासून ते लव-कुश यांच्या जन्मापर्यंतचा चित्राविष्कार

    श्रीराम नवमी निमित्त अशोका आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी भव्य आणि सुंदर कलाविष्कार

वारली चित्रातून साकारलाय संपूर्ण राम जन्मापासून ते लव-कुश यांच्या जन्मापर्यंतचा चित्राविष्कार


वारली चित्रातून साकारलाय संपूर्ण राम जन्मापासून ते लव-कुश यांच्या जन्मापर्यंतचा चित्राविष्कार


    अहमदनगर (प्रतिनिधी)  -  अशोका आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या रामायणातील विविध प्रसंग वारली चित्राच्या माध्यमातून साकारले आहेत. भव्य अशा तीन फूट बाय 40 फूट मापाच्या भव्य चित्रात श्रीरामाचा जन्म, श्रीराम आणि लक्ष्मण यांनी गुरुगृही घेतलेले शिक्षण, सीता स्वयंवर प्रसंगी शिवधनुष्या उचलण्याचा प्रसंग,  भव्य राम-सीता विवाह, याप्रसंगी अवकाशातून पुष्पवृष्टी करणारे देववृंद, 
आनंद व्यक्त करणारी प्रजा, श्रीराम- सीता यांचे वनवास प्रस्थान, सीता हरण, जटायुवध, महाबली हनुमाने केलेले लंका दहन, सुग्रीव - बाली युद्ध, संजीवनी पर्वत आणणारे सामर्थ्यशाली हनुमान, श्रीराम आणि रावण यांचा युद्ध प्रसंग, श्री राम-सीता यांचा आयोध्या प्रवेश, आणि लव -कुश यांचा जन्म असे विविध प्रसंग विद्यार्थ्यांनी या भव्य चित्रात दर्शविले आहेत.
     या चित्रातील विविध प्रसंगांना समर्पक अशी डोंगर, पाणी, वृक्ष, प्राणी पक्षी, सूर्य, चंद्र आदी निसर्ग दृश्य अतिशय सुंदर दर्शविली आहेत.  श्रीरामाचे जन्मस्थळ आयोध्या आणि या आयोध्येत आज उभारलेले भव्य मंदिर चित्राच्या मध्यावर रेखाटले आहे. मंदिराभोवती राम जन्माचा उत्सव साजरा करणारे, ढोल ताशा वाजविणारे, रांगोळी काढणारे रामभक्त दर्शविले आहेत. आनंदाने नृत्य करणारे नागरिक, अवकाशातून पुष्पवृष्टी करणारे देवगन, इंद्राचा हत्ती या चित्रात दर्शविला आहे.  वारली चित्रातील विविध आकारांचा उपयोग करून श्रीरामाचे चित्र मध्यावर रेखाटले आहे. फक्त पांढर्‍या रंगाचा उपयोग करून गडद रंगाच्या पेपरवर हे भव्य समूह चित्र अशोका आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी आठ दिवसात साकारले आहे.
     इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ.हर्षदा डोळसे आणि प्रियंका लांडे, सानिका क्षीरसागर, अथश्री कोदे, समीक्षा तोडकर, सौ समिधा राजपूत, श्रद्धा डोळसे, दूर्वा हजारे, अविष्कार पुरोहित, शृंगार पर्वत, भालेकर अथर्व, स्वरा हिवाळे, अन्वी खरमाळे, अनुजा रासकर, शौर्य थोरात, निलाक्षी वामने,  रिधिमा, अद्विता पालवे, नक्षीता, आणि श्रीया कुलकर्णी आदी विद्यार्थ्यांनी या समूह चित्रातून आपला चित्राविष्कार दर्शविला आहे. या कला उपक्रमासाठी कलाशिक्षक व चित्रकार अशोक डोळसे यांनी मार्गदर्शन केले आहे.

     यापूर्वी देखील ऐतिहासिक नगर शहरातील विविध वास्तूंच्या चित्रांचे तीन 3 फुट बाय 50 फूट मापाचे भव्य चित्र, आय लव आर्ट नावाचे भव्य संकल्प चित्र आणि पाणी बचत करण्याचा सामाजिक संदेश देणार्‍या चित्राची निर्मिती इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. स्वआनंद आणि सामाजिक जाणीव दर्शविणारे विविध कला उपक्रम सातत्याने अशोका आर्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.